Sunil Gavaskar Playing XI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. सेंच्युरियनच्या वेगवान खेळपट्टीवरील या सामन्यासाठी गावसकरांनी एकूण 5 गोलंदाजांची निवड केली आहे, ज्यात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटूंचा समावेश आहे.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील पहिल्या कसोटीसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुल याला आपली पहिली पसंती दिली आहे. तसेच, रोहित शर्मा याच्यासोबत सलामीचा फलंदाज म्हणून यशस्वी जयसवाल याची निवड केली आहे. गावसकरांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शुबमन गिलला तिसऱ्या स्थानी ठेवले आहे.
काय म्हणाले गावसकर?
स्टार स्पोर्ट्सवर पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन निवडताना गावसकर म्हणाले, “माझी प्लेइंग 11 खूपच साधी असणार आहे. माझी प्लेइंग 11 आहे, सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि कर्णधार रोहित शर्मा, तिसऱ्या स्थानी शुबमन गिल, चौथ्या स्थानी विराट कोहली, पाचव्या स्थानी केएल राहुल आणि सहाव्या स्थानी श्रेयस अय्यर. 5-6 नंबरच्या फलंदाजांना वर-खाली करता येऊ शकते.”
याव्यतिरिक्त गावसकरांनी 5 गोलंदाजांच्या रूपात रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या जोडीसह मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना निवडले. गावसकर म्हणाले, “नंबर 7 आणि 8वर रवींद्र जडेजा आणि आर अश्विन असतील. त्यानंतर तीन वेगवान गोलंदाजांना निवडेल, ज्यात मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सामील असतील.”
यादरम्यान माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनीही प्लेइंग इलेव्हनची निवड केली. मांजरेकरांच्याही प्लेइंग इलेव्हनमधील अव्वल 6 खेळाडू गावसकरांच्या प्लेइंग इलेव्हनशी जुळतात. त्यांनी गोलंदाजी युनिटमध्ये काही बदल केले आहेत. मांजरेकरांनी शार्दुल ठाकूरसह चार वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना निवडले आहे. त्यांनी एक फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजाला निवडले आहे.
गावसकरांची प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
मांजरेकरांची प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज (former cricketer sunil gavaskar picks playing xi for ind vs sa 1st test virat kohli rohit sharma including 5 bowlers)
हेही वाचा-
‘माझा एक पाय नकली…’, दुखापतग्रस्त असूनही मजा-मस्ती करायला विसरला नाही सूर्या, पाहा मजेदार Video
‘वाद केवळ मैदानात…’, नवीनसाठी विराटशी भिडणाऱ्या गंभीरचे चोख उत्तर, व्हिडिओ व्हायरल