---Advertisement---

क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल

On: मंगळवार, डिसेंबर 22, 2020 12:28 PM
---Advertisement---

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना आणि गायक गुरु रंधावा यांना मुंबईत अटक करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच समोर येत आहे. मुंबई विमानतळाजवळील ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते. तसेच त्यांना नंतर जामीनावर सोडण्यात आले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार पोलिसांनी छापा टाकल्यानंतर एकूण ३४ जणांना अटक करण्यात आली. यात ७ क्लबच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सहार पोलीस स्टेशनचे सिनीयर पीआय म्हणाले, गुरु रंधावा व क्रिकेटर सुरेश रैना हे त्या लोकांमध्ये आहेत, ज्यांना आम्ही ताब्यात घेतले होते. त्यांनी काही नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांना नंतर जामीनावर सोडण्यात आले आहे.

याबरोबरच रैना आणि रंधावासह सुजान खान, बादशाहा असे काही सेलिब्रेटीही या क्लबमध्ये असल्याचे उघडकीस येत आहे.

मुंबई पोलीसांनी सुरेश रैनासह ३४ जणांना आयपीसीच्या कलम १८८, २६८ व ३४ अंतर्गत आणि एनएमडीएच्या तरतुदींनुसार ताब्यात घेतले होते. परवानगी असलेल्या वेळेपेक्षा अधिकवेळ क्लब चालू ठेवण्याबद्दल आणि कोविड नियमांचे उल्लंघन करत असल्याने ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा टाकण्यात आला होता. हा छापा मंगळवारी पाहाटे ३ वाजताच्या सुमारास टाकला असल्याचेही उघड होत आहे.

सुरेश रैनाने याचवर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळले असून २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. तसेच रैनाने यावर्षीच्या आयपीएलमधूनही माघार घेतली होती. यादरम्यान तो काही सामाजिक कार्य करताना पाहायला मिळाला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

गुलाबी चेंडू नकोच! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाजाचा गुलाबी चेंडूला विरोध

ब्रेकिंग! भारतीय क्रिकेटर सुरेश रैनाला पोलिस छाप्यानंतर मुंबईत अटक

भन्नाट शक्कल लढवतोय ‘हा’ क्रिकेटर, चक्क गोलंदाजांसाठी बनवतोय हेल्मेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---