---Advertisement---

‘टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतच जिंकेल’, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

India-vs-Pakistan
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान संघाचा टी20 विश्वचषक 2022मधील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैना याने मोठे वक्तव्य केले. खरं तर, त्याने या सामन्याबद्दल भाकीत व्यक्त केले आहे. त्याने या विश्वचषकात भारताच्या चांगल्या कामगिरीबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. त्याला वाटते की, भारत यावेळी पाकिस्तानला पराभूत करेल आणि आपल्या विश्वचषकातील आव्हानाची सुरुवात विजयाने करेल.

मागील वर्षी म्हणजे, 2021 मध्ये खेळण्यात आलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान संघाने भारताला पराभूत करत सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच, पाकिस्तानने विश्वचषकाच्या इतिहासात भारताविरुद्ध आपला पहिला विजय साजरा केला होता. मागील वेळी भारताचा पहिला सामना बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 151 धावांचे आव्हान उभे केले होते. पाकिस्तानने बाबर आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांच्या नाबाद अर्धशतकी खेळींच्या जोरावर 10 विकेट्स शिल्लक ठेऊन आव्हान पार करत सामना खिशात घातला होता.

असे असले, तरीही सुरेश रैना (Suresh Raina) याला विश्वास आहे की, भारतीय संघ यावेळी पाकिस्तान संघाला मात देण्यात यशस्वी होईल. त्याने असेही म्हटले की, भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमीच पाकिस्तानपेक्षा चांगल्या योजनेसोबत उतरला आहे.

माध्यमांशी बोलताना सुरेश रैना म्हणाला की, “पाकिस्तानने मागील टी20 विश्वचषकात आमच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. मात्र, आम्ही चांगली कामगिरी करत आहोत आणि हा सामना भारतासाठी खूप सोपा नसेल. मला वाटते की, ते दुबईतील पराभवाबद्दल विचार करत असतील. त्यांनी आपला चांगला खेळ खेळण्याची गरज आहे. तसेच, आम्ही नेहमीच चांगली योजना बनवतो, परंतु ज्याप्रकारे त्यांनी फलंदाजी केली आणि संघाला सांभाळले, त्याचे श्रेय बाबर आझमला जाते.”

‘पाकिस्तानविरुद्धचा विजय पूर्ण स्पर्धेसाठी महत्त्वाचा ठरेल’
पुढे बोलताना रैना म्हणाला की, “आपल्याला पहिल्या सामन्यासाठी लय तयार करण्याची गरज आहे, ज्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा विजय आणि पूर्ण टी20 विश्वचषक त्याचप्रकारे जाईल. बीसीसीआयने खेळाडूंना लवकर ऑस्ट्रेलियाला पाठवून चांगले काम केले आहे. त्यामुळे ते सहजरीत्या परिस्थितीशी ताळमेळ बसवून घेतील. सर्वकाही कव्हर करण्यात आले आहे. तसेच, ते खूपच उत्सुक आहेत आणि त्याच्यात विजयाची भूक दिसते.”

अशात रैनाने केलेले वक्तव्य कितपत खरे ठरते, हे 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यानंतरच स्पष्ट होईल. या सामन्यासाठी चाहते खूपच उत्साहित आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 65 धावांवर ढासळली श्रीलंकन टीम, भारतीय संघ सातव्यांदा उंचावणार आशिया चषक

बांगलादेशने टी20 विश्वचषकाच्या संघात केला बदल, मुख्य संघातील ‘या’ दोन खेळाडूंची थेट घरी पाठवणी!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---