मंगळवारी (दि. 27 जून) आयसीसीने भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान खेळली जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाईल. या वेळापत्रकाची चर्चा सुरूच होती की, तेवढ्यात भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातील संघांविषयी मोठी भविष्यवाणी केली.
काय म्हणाला सेहवाग?
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला की, “नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे एक लाखांपेक्षा जास्त लोक भारत-पाकिस्तानविरुद्धचा सामना पाहतील. विराटला माहितीये की, तेथील खेळपट्टी परिस्थिती कशाप्रकारची आहे. मला खात्री आहे की, तो या विश्ववचषकात धावांचा पाऊस पाडेल आणि भारतासाठी सर्वोत्तम प्रदर्शनही करेल.”
सेहवागने पाकिस्तानविरुद्ध भारताला विजयाचा दावेदार सांगत म्हटले की, “मला वाटते की, पाकिस्तानविरुद्ध दबावाच्या स्थितीत भारत शानदार पद्धतीने सामना करतो. 1990च्या दशकात पाकिस्तान संघ दबाव झेलण्याच्या बाबतीत शानदार होता, पण 2000नंतर भारतीय संघ याबाबतीत शानदार असल्याचे म्हटले जात आहे.”
तो म्हणाला की, “खेळपट्टी जर फलंदाजीसाठी चांगली असली, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकात चांगली कामगिरी करतील. मात्र, जर खेळपट्टीतून फिरकीपटूंना मदत मिळाली, तर त्यांचे फलंदाज संघर्ष करतील. परदेशी खेळाडूंच्या तुलनेत उप खंडातील खेळाडूंना फिरकी खेळण्याचा चांगला अनुभव असतो.”
त्याने आशा व्यक्त केली की, साखळी फेरीनंतर भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य किंवा अंतिम सामन्यात भिडू शकतात. या दोन संघांव्यतिरिक्त अंतिम चारसाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघही मजबूत दावेदार असतील.
विश्वविजेत्या संघाचा भाग होता सेहवाग
भारतीय संघाने 28 वर्षांनंतर 2011मध्ये दुसरा वनडे विश्वचषक आपल्या नावावर केला होता. या विश्वचषक विजेत्या संघात वीरेंद्र सेहवाग याचाही सहभाग होता. सेहवागने 2011 विश्वचषक स्पर्धेत सेहवागने 8 सामने खेळले होते. त्यात त्याने 47.50च्या सरासरीने 380 धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतकही झळकावले होते. या विश्वचषकात 175 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. (former cricketer virender sehwag predicts top 4 team for world cup semi finalists of the tournament world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
‘एमएस धोनी सर्वात खतरनाक गोलंदाज’, माजी सहकाऱ्याचे मोठे विधान, वाचून शमी अन् बुमराह होतील हैराण
नाद करा पण पुण्याचा कुठं! एलिमिनेटर सामन्यात ‘बाप्पा’चा दणदणीत विजय, अद्वयमुळे ‘क्वालिफायर 2’मध्ये एन्ट्री