भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 99 धावांनी जिंकला. या विजयात भारतीय संघाच्या फलंदाजांना बॅटमधून धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. भारताने सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे आव्हान दिले. ही धावसंख्या उभारताना यावेळी श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांनी शतक झळकावले, तर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनीही विस्फोटक अर्धशतक साकारले. या खेळाडूंच्या विजयामुळे भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. त्याने शुबमन, श्रेयसपासून सूर्यापर्यंत सर्वांचे कौतुक केले आहे.
भारतीय डावादरम्यान श्रेयस अय्यर (105) आणि शुबमन गिल (104) शतक झळकावले. त्यांच्यापाठोपाठ केएल राहुल (52) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 72) यांनीही अर्धशतक केले. विशेष म्हणजे, सूर्याने डावादरम्यान कॅमरून ग्रीन याच्या गोलंदाजीवर सलग 4 चेंडूंवर 4 षटकारांची बरसात केली. त्याची ही खेळी पाहून तो वनडे क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये आल्याचे चाहते म्हणू लागले. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. खरं तर, मागील काही काळापासून वनडेतील खराब फलंदाजीमुळे सूर्यावर टीकास्त्र डागले जात होते. मात्र, मोहाली आणि इंदोर या दोन्ही मैदानांवर त्याने सलग 2 अर्धशतके झळकावली.
भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीवर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) फिदा झाला. त्याने ट्वीट केले. त्याचे हे ट्वीट वनडे विश्वचषक 2023 संदर्भात आहे. त्याने लिहिले की, “डोकं एक, डोकेदुखी अनेक. विश्वचषकापूर्वी भारतासाठी चांगली समस्या. योग्यवेळी निवड केली आणि सर्वजण पार्टीत सहभागी होतायेत.” अशात भारतीय संघ व्यवस्थापनासाठी मोठी समस्या असेल की, ते प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाकोणाला जागा देतात.
Head Ek Headache Anek.
A good problem to have for Bharat before the World Cup. Peaking at the right time and everyone joining the party. pic.twitter.com/WJx51xNmTh
— Virender Sehwag (@virendersehwag) September 24, 2023
याव्यतिरिक्त सेहवागने इंस्टाग्रामवरही एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. त्याने लिहिले की, “3 इनिंग्समध्ये 3 गोल्डन डकनंतर, 4 चेंडूत 4 षटकार. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्याकडून अप्रतिम 100, पण सूर्यकुमार यादव हा वेगळा आहे. आमचे सर्व अव्वल 5 खेळाडू समान गतीने खेळू शकतात, परंतु स्काय हा वेगळा आहे. तो स्वत:च्या बळावर मॅच फिरवू शकतो. टकाटक चकाचक.”
https://www.instagram.com/p/Cxk2X45LTvS/
भारतीय संघ व्यवस्थापनाने विश्वचषकासाठीचे स्क्वॉड आधीच घोषित केले होते. सर्व संघांना 28 सप्टेंबरपर्यंत आपल्या स्क्वॉडमध्ये बदल करता येऊ शकतो. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत आर अश्विन (R Ashwin) याने 7 षटकात 41 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. त्याचे हे प्रदर्शन पाहून असे म्हटले जात आहे की, जर अक्षर पटेल पूर्णपणे फिट झाला नाही, तर त्याच्या जागी अश्विनला ताफ्यात सामील करू शकतात. (former cricketer virender sehwag social media post after shreyas iyer shubman gill kl rahul suryakumar yadav superb performance in india vs australia 2nd odi)
महत्त्वाच्या बातम्या-
‘श्रेयस-गिलनंतर राहुल आणि सूर्याने तेच केले, जे…’, पराभवानंतर स्मिथची सर्वात मोठी प्रतिक्रिया
इंदोरमध्ये अश्विनचा भीमपराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनिल कुंबळेचा मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त