टी20 विश्वचषक 2022 या महत्त्वाच्या स्पर्धेतही भारतीय संघाचा एक फलंदाज खूपच खराब फॉर्मचा सामना करत आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून केएल राहुल हा आहे. गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध खेळताना त्याला फक्त 9 धावा करता आल्या होत्या. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून देण्यात राहुल अपयशी ठरला. तो पॉल व्हॅन मीकरन याच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. यानंतर भारतीय संघाचा माजी विस्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग हा भलताच निराश दिसला. त्याने यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मैदानावर उपस्थित असणाऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याशी चर्चा केली. यानंतर असे वाटले की, कदाचित रोहितने त्याला रिव्ह्यू घेण्यासाठी सांगितले. कारण, चेंडू कदाचित लेग स्टंपच्या बाहेर जात होता. मात्र, राहुलने रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला आणि तो मैदानाबाहेर गेला. मात्र, रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता. त्यामुळे राहुलला रिव्ह्यू न घेण्याचा फटका बसला.
KL Rahul missed a big opportunity by not taking the review. pic.twitter.com/CsA4uQcpEE
— Johns. (@CricCrazyJohns) October 27, 2022
राहुलच्या या निर्णयामुळे वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) निराश झाला. तो म्हणाला की, “एक केएल राहुल आहे, जर त्याने डीआरएस घेतला असता, तर तो धावा करू शकला असता. बाद झाला नसता, माहिती नाही त्याने डीआरएस का घेतला नाही.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी 2011मध्ये नियम बनवला होता. जर माझ्या पॅडवर चेंडू लागला, तर मी डीआरस घेणार म्हणजे घेणार. तुमच्यासाठी एक आहे, माझ्यासाठी एक आहे. बाकीच्या दहा खेळाडूंसाठी एक. तुम्हीच निर्णय घ्यायचा की, तो केव्हा घेतला पाहिजे. मी तर माझ्यासाठी एक घेतला.” फॉर्मविषयी बोलताना तो म्हणाला की, “चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तर घेतलाच पाहिजे आणि नसेल, तर नक्कीच घेतला पाहिजे. सर्वांनी फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे.”
सामन्याबद्दल थोडक्यात
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर रोहित शर्मा (53 धावा), विराट कोहली (62 धावा) आणि सूर्यकुमार यादव (51 धावा) यांनी अर्धशतक झळकावत संघाची धावसंख्या 2 बाद 179 पर्यंत पोहोचवली. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावत 123 धावाच करता आल्या.
या विजयासह भारतीय संघ आपल्या ग्रूपमध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे. यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 4 विकेट्सने पराभूत केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिंकलो रे! नेदरलँड्सला पराभूत करत भारताची विजयी घोडदौड सुरूच, 56 धावांनी सामना घातला खिशात
सूर्या भाऊंनी गाजवलं 2022 वर्ष! विराटच्याही एक पाऊल पुढं निघाला पठ्ठ्या, पाहा काय केलाय विक्रम