भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. आतापर्यंत या मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघाचे जवळपास 9 खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाला ब्रिस्बेन येथे होणार्या चौथ्या सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंना संधी द्यायची ही चिंता सतावत आहे. त्यावर भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाच्या जखमी खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, आर अश्विन, हनुमा विहारी या खेळाडूंचा समावेश आहे. यावर विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यांनी प्रतिक्रिया देताना म्हणले आहे की, जर चौथ्या कसोटी सामन्यासाठी अकरा खेळाडू होत नसतील, तर सेहवाग ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार आहे.
त्याचबरोबर त्यांनी अशी प्रतिक्रिया देताना ट्विटमध्ये बीसीसीआयला सुद्धा टॅग केले आहे आणि म्हटले आहे की तुम्ही क्वारंटाइनच्या नियमाबद्दल बघून घ्या. यामधे सेहवागने मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि हनुमा विहारी यांचे फोटो जोडले आहेत. त्यामुळे सेहवागचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.
Itne sab players injured hain , 11 na ho rahe hon toh Australia jaane ko taiyaar hoon, quarantine dekh lenge @BCCI pic.twitter.com/WPTONwUbvj
— Virender Sehwag (@virendersehwag) January 12, 2021
ऑस्ट्रेलिया संघाचा 1988 नंतर कधीही ब्रिस्बेन येथे पराभव झालेला नाही. पण आता त्यांची ही विजयी मालिका खंडीत करण्याच्या इराद्याने भारतीय संघ 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियममध्ये चौथा सामना खेळण्यासाठी उतरेल. सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चालू असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे ब्रिस्बेन येथे होणारा सामना निर्णायक असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारताविरुद्धची मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार बदलला तर मला आश्चर्य वाटणार नाही”
…म्हणून डेविड वॉर्नरने मागितली मोहम्मद सिराज आणि भारतीय संघाची माफी