भारतीय संघाने टी20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही विजयी पताका फडकावला. वनडे मालिकेत भारताच्या इशान किशन आणि संजू सॅमसन या तगड्या फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी केली. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांच्यावर चोहो बाजूंनी कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, भारताचा माजी दिग्गज खेळाडू वसीम जाफर याचे म्हणणे आहे की, हे दोघेही वनडेत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याची जागा घेऊ शकत नाहीत. यासोबतच त्याने काही महत्त्वाच्या गोष्टींचाही उल्लेख केला. चला जाफर असे का म्हणाला जाणून घेऊया…
भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने यावेळी आपले मत मांडले. महत्त्वाचं म्हणजे, त्याने मत मांडण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावरील रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या 113 चेंडूतील नाबाद 125 धावांच्या खेळीचे उदाहरण दिले. यावेळी त्याने म्हटले की, संजू सॅमसन (Sanju Samson) याला वनडेत नक्कीच सामील केले पाहिजे, पण तो पंतची जागा घेऊ शकत नाही.
‘संजू सॅमसनला रिषभ पंतच्या जागी सामील केले नाही पाहिजे’
माध्यमांशी चर्चेदरम्यान जेव्हा त्याला विचारले की, इशान किशन (Ishan Kishan) आणि सॅमसन वनडे संघात पंतची जागा घेऊ शकतात का? त्यावर जाफरने उत्तर दिले. तो म्हणाला की, “माझा असा विचार नाही. मला वाटते की, आम्ही इंग्लंडमध्ये त्याच्या मालिका जिंकणाऱ्या 100 धावांना सहजरीत्या विसरलो आहोत. हे वनडे क्रिकेटमध्ये होते. टी20 क्रिकेटमध्ये निश्चितरीत्या तो चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत नाहीये. मात्र, कसोटी आणि वनडेत मला वाटत नाही की, अद्याप त्याचा कुणी विरोधी आहे. केएल राहुल यष्टीरक्षण करू शकतो आणि संज सॅमसन प्रभावी ठरला आहे. मला वाटत नाही की, तुम्ही वनडे क्रिकेटमध्ये रिषभ पंतची जागा घेण्यासाठी विचार करू शकता. संजू सॅमसनला आपल्या खेळीमुळे योजनेमध्ये असायला हवे, परंतु पंतच्या जागी नाही.”
विशेष म्हणजे, टी20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात असल्यामुळे रिषभ पंत याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आले नाही. दुसरीकडे, इशान आणि संजूच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर इशानने आणि सॅमसनने या मालिकेत अनुक्रमे 123 आणि 118 धावा चोपल्या आहेत. किशनने दुसऱ्या वनडेत 84 चेंडूत 93 धावा चोपल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे, त्याने या खेळीत 4 चौकार आणि 7 षटकारांचा पाऊस पाडला होता. यामुळे त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंदही झाली होती. तसेच, सॅमसन मालिकेत एकदाही बाद झाला नाही. त्याने एक अर्धशतकही झळकावले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला नाही तसलं बोलला इंग्लंडचा दिग्गज, वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात
रोहितच्या विक्रमांना विराटकडून धोका, टी20 विश्वचषकात जाळ अन् धूर संगटच काढणार ‘किंग कोहली’