भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात आयपीएल 2023च्या एका सामन्यादरम्यान मोठा वाद झाला होता. स्पर्धेच्या 43व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती. मात्र, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला होता. मात्र, अनेक माजी खेळाडूंनी यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच म्हटले होते की, ही बिल्कुल योग्य नाहीये. अशात भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग यानेही यावर आपली प्रतिक्रिया देत ट्वीट केले आहे.
‘षटकार किंग’ युवराज सिंग (Yuvraj Singh) याने ट्वीट करत लिहिले की, “मला वाटते की, स्प्राईटने गौती आणि चीकूला आपले अभयान ठंड रखसाठी साईन केले पाहिजे. काय म्हणता मित्रांनो?”
I think #Sprite should sign #Gauti and #Cheeku for their campaign #ThandRakh 🤪🥶 what say guys? 😎 @GautamGambhir @imVkohli @Sprite
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) May 4, 2023
विशेष म्हणजे, युवराजने विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) या दोघांना टॅगही केले आहे. विशेष म्हणजे, युवराज हा त्याच्या मजेशीर अंदाजासाठी खूपच प्रसिद्ध आहे. युवराज त्याच्या कारकीर्दीतही अनेक खेळाडूंची खिल्ली उडवण्याची संधी सोडत नव्हता.
विराट-गंभीर वाद
खरं तर, हा संपूर्ण वाद लखनऊ संघाच्या डावातील 17व्या षटकादरम्यान सुरू झाले होते. सामन्यादरम्यान विराट यष्टीमागे धावत येतो आणि लखनऊ संघाचा खेळाडू नवीन उल हक याला काहीतरी बोलतो. यानंतर नवीनही त्याला उत्तर देतो. सामन्यानंतर जेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी हातमिळवणी करत असतात, तेव्हा हे दोघे खेळाडू पुन्हा एकमेकांशी बाचाबाची करताना दिसतात.
हे प्रकरण तेव्हा आणखी बिघडते, जेव्हा विराट कोहली लखनऊचा फलंदाज काईल मेयर्सशी बोलत असतो. तसेच, गौतम गंभीर त्याला विराटपासून दूर घेऊन जातो. यानंतर दोन्ही भारतीय खेळाडूंमध्ये चांगलाच वाद होतो. यावेळी इतर खेळाडू त्यांचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करताना दिसतात. (former cricketer yuvraj singh on the controversy between virat kohli and gautam gambhir during lsg vs rcb)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा पराभव पचवणे कठीण, आम्ही चुकाच…’, राणासेनेकडून पराभूत झाल्यानंतर हैदराबादच्या कर्णधाराची कबुली
आधी गंभीरला नडला, नंतर विराटने आख्ख्या जगाला सांगितलं, कोण आहे ‘क्रिकेटचा खरा बॉस’, वाचाच