---Advertisement---

इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू बॉब विलिस यांचे निधन

On: गुरूवार, डिसेंबर 5, 2019 10:40 AM
---Advertisement---

इंग्लंडचे माजी कर्णधार आणि दिग्गज वेगवान गोलंदाज बॉब विलिस यांचे बुधवारी थायरॉईड कर्करोगाने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांनी 1971 ते 1984 या 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळताना 325 विकेट्स घेतल्या होत्या.

ते इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 1970-71 च्या ऍशेस मालिकेतून केली होती. त्यांना त्यांच्या वेगळ्या गोलंदाजी शैलीमुळे ‘गुज’ (एक प्रकारचा पक्षी) या टोपन नावानेही ओळखले जायचे.

तसेच त्यांनी 1981 च्या अ‍ॅशेस मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीसाठी ते नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी हेडिंग्ले कसोटीत इंग्लंड विरुद्ध 43 धावा देत 8 विकेट्स घेतल्या होत्या.

1982 मध्ये त्यांनी भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व केले. त्यांनी कर्णधार म्हणून आपल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मिश्रित यशाची चव चाखली. पण त्यांना पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर 1984 च्या सुरुवातीला कर्णधारपदावरुन काढून टाकले.

विलिस यांना 90 कसोटी सामन्यांबरोबरच 64 वनडे सामने खेळले. यामध्ये त्यांनी 80 विकेट्स घेतल्या. तसेच त्यांनी 308 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 899 विकेट्स घेतल्या. तर 293 अ दर्जाचे सामने खेळताना 421 विकेट्स घेतल्या.

त्यांना 1978 मध्ये विस्डेनचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता. विलिस यांनी 1984 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी ते इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे यशस्वी गोलंदाज होते.निवृत्तीनंतर त्यांना समालोचक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---