---Advertisement---

माजी दिग्गजाने हेरली विराटमधील कमतरता! म्हणाला, ‘शैलीमध्ये काहीच कमी नाही, पण…’

On: शनिवार, जुलै 16, 2022 1:27 PM
Virat-Kohli-Ravi-Shastri
---Advertisement---

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. विराटला अलीकडच्या काळात अनेक दिग्गज वेगवेगळे सल्ले देत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही विराटच्या सध्याच्या फॉर्मविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी वॉनने विराटच्या खेळीतील कमतरात दाखवून देण्याचे काम केले आहे.

विराटच्या मुव्हमेंट आणि शैलीत काहीच चूक नाही –
मायकल वॉर्न (Michael Vaughan) याने यापूर्वीही विराटला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. आता वॉर्नने त्याला पुन्हा एकदा असाच सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, “सद्या विराट कोहलीचे लक्ष विचलीत होत आहे आणि त्यामुळेच तो खेळावर फोकर करू शकत नाहीये. त्यामुळे या दिग्गज खेळाडूने विश्रांती घेतली पाहिजे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या मुव्हमेंट किंवा शैलीमध्ये काहीच कमी नाहीये, पण मला वाटते की, शक्यतो लक्ष विचलीत झाल्यामुळे तो अशा चुका करून बसतो.”

“मला आधीपासूनच वाटत आहे की, विराटला विश्रांतीची गरज आहे. मला असे वाटते की, चेंडू पाहून तो कसा खेळायचा, यासाठी दृढ मानसिकता असावी लागते,” असेही वॉन पुढे बोलताना म्हणाला. भारतीय संघाचा माजी दिग्गज गोलंदाज जहीर खाननेही विराटच्या खराब फॉर्मविषयी मत मांडले. जहीरच्या मते विरटचा स्वतःचा निर्णय असेल की, त्याला विश्रांती हवी आहे की, खेळायचे आहे.

दरम्यान, विराट सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने १० विकेट्सने जिंकला, पण दुखापतीमुळे विराट या सामन्यात खेळू शकला नव्हता. उभय संघातील दुसऱ्या सामन्यासाठी विराट उपलब्ध होता, पण त्याने अवघ्या १६ धावा करून विकेट मगावली. फलंदाजांच्या खराब प्रदर्शनामुळे भारताने हा सामना १०० धावांच्या अंतराने मगावला होता.

विराटच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर चाहते मागच्या अडीच वर्षांपासून त्याच्या शतकाची वाट पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये ७० शतक केलेल्या या फलंदाजाने शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये केले होते. त्यानंतर आजपर्यंत तो धावा करण्यासाठी झगडतानाच दिसला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘रिषभ पंत भारतासाठी ठरू शकतो मॅचविनर, फक्त…’, भारताच्या माजी दिग्गजाने दिला बीसीसीआयला सल्ला

‘भारतात अजून असा कोणी जन्माला नाही जो, विराटला…’ पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे खळळबळजनक विधान

‘विराटच्या दुखण्यावर फक्त सचिनच करू शकतो मलमपट्टी’, जडेजाचे मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---