‘विराटच्या दुखण्यावर फक्त सचिनच करू शकतो मलमपट्टी’, जडेजाचे मोठे विधान

'विराटच्या दुखण्यावर फक्त सचिनच करू शकतो मलमपट्टी', जडेजाचे मोठे विधान

विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहेत. विराटने त्याचा जुना फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी आजपर्यंत अनेक दिग्गजांनी वेगवेगळे सल्ले दिले आहेत. परंतु भारतीय संघाचे माजी दिग्गज अजय जडेजा यांना असे वाटते की, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने जर विराटला सल्ला दिला, तर तो फायदेशीर ठरू शकतो.

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून विराट कोहली (Virat Kohli) वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. दुखापतीमुळे त्याला पहिल्या सामन्यात विश्रांती दिली गेली होती. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट खेळला पण अवघ्या १६ धावा करून बाद झाला. दुसऱ्या वनडेमध्ये भारताला विजयासाठी २४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण भारतीय संघ १४६ धावांवर गुंडाळला गेला. इंग्लंडने हा सामना १०० धावांनी जिंकला.

सचिनच करू शकतो विराटची मदत –
विराटचे प्रदर्शन दिवसेंदिवस खालावत चालले असून माजी दिग्गज अजय जडेजा (Ajay Jadeja) यांच्या मते फक्त सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे, जो विराटला या खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी मदत करू शकतो. जडेजा म्हणाले की, “मी हे आठ महिन्यांपूर्वीच म्हटलो होतो की, फक्त एक व्यक्ती आहे जो समजू शकतो की, विराट कोणत्या काळातून जात आहे. तो व्यक्ती आहे सचिन तेंडुलकर. विराटने फक्त या एकाच व्यक्तीला फोन केला पाहिजे की, चला सोबत ड्रिंक घेऊयात किंवा सोबत जेवण करूया. कारण दुसरा कोण आहे, ज्याने १४-१५ व्या वर्षी खेळायला सुरुवात केली  आणि कधीच खराब काळ पाहिला नाही ? फक्त पुढे चालत राहिला आणि नवीन उंची गाठली, जशी सचिनने गाठली होती.”

जडेजा पुढे म्हणाले की, “मी दुसऱ्या कुणाविषयी विचार करू शकत नाही. कारण मला वाटते खी, या सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यात आहेत. तो सचिनपासून फक्त एका फोनच्या अंतरावर आहे. मला वाटते की, विराटने जर फोन केला नाही, तर सचिननेच त्याला फोन केला पाहिजे. अनेकदा युवा खेळाडू अशा खराब काळातून जात असतात. जेव्हा तुम्ही मोठे असता आणि तुम्ही असा काळातून गेलेले आहात, त्यामुळे तुमचे काम आहे की, तुम्ही फोन करावा. मला आशा आहे मास्टर (सचिन) असे करेल.”

दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना १७ जुलै रोजी खेळला जाणार आहे. विराटकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. मागच्या जवळपास अडीच वर्षांपासून विराटच्या बॅटमधून शतक निघाले नाहीये आणि चाहते त्याचे शतक पाहण्यासाठी आतुर आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

याला काय अर्थय! भारतीय खेळाडूंना साधे कॅचही पकडता येत नाहीत, ६ सामन्यात सोडलेत ‘एवढे’ झेल

न्यूझीलंडच्या गोलंदाजांना ३६० धावा पण पुरेना, आयर्लंडच्या फलंदाजांनी काढलाय घाम

म्हणून भारताला २०२३च्या विश्वचषकात महत्वाचे स्थान, विश्वविजेत्या इंग्लंडला डावलत टीम इंडियाला पहिले प्राधान्य

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.