भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2022पूर्वीच ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती आणि खेळपट्टीशी सामंजस्य बसवण्यासाठी भारत आधीच तिथे पोहोचला. खेळाडूंनी टी20 विश्वचषकापूर्वी ज्याप्रकारे वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांशी ताळमेळ बसवला आहे, त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आनंदी आहे. अशात भारतीय संघ कठोर सराव सत्रातून जात आहे. यामध्ये फिटनेस, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सरावही सामील आहे. मात्र, त्यापूर्वी आता इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी मोठा दावा करत खळबळ माजवली आहे.
नासिर हुसेन यांचा भारताबद्दल दावा
इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन (Nasser Hussain) यांना वाटते की, भारतीय संघाकडे चांगले खेळाडू आहे. संघ जवळपास प्रत्येक द्विपक्षीय मालिकेत जिंकत आला आहे. मात्र, जेव्हा विश्वचषकासारख्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ भित्र्यासारखा खेळतो. तसेच, इथे त्यांना मोठे नुकसानही होते. नासिर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “आयसीसी इव्हेंट्समध्ये भारतीय संघ सातत्याने वाईटरीत्या खेळताना दिसत आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. मात्र, हेही खरे आहे की, मोठ्या स्पर्धांमध्ये ते भित्र्यासारखे खेळतात. असे वाटते की, ते आपल्याच खोलात जात आहेत.”
नासिर हुसेन यांनी पुढे म्हटले की, “भारतीय संघाकडे आक्रमक डाव खेळण्याची क्षमता आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) शानदार फॉर्मात आहे. रोहित शर्मा ज्यादिवशी टिकतो, त्यादिवशी तो एकट्याच्या दमावर सामन्याचा कायापालट करू शकतो. विराट कोहली याच्याबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे. संघातील दोन स्टार खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाहेर आहेत. अशात भारताला तीच मानसिकता ठेवावी लागेल, ज्या प्रकारे भारतीय संघ द्विपक्षीय मालिकेत खेळताना जिंकत आला आहे.”
भारताचा पहिला विश्वचषक
भारतीय क्रिकेट संघाने 1983मध्ये पहिला वनडे विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला पुढील विश्वचषक जिंकण्यासाठी 28 वर्षे लागली होती. 2011 मध्ये एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक आपल्या नावावर केला. मात्र, 2007मध्ये पहिला वहिला टी20 विश्वचषकही धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जिंकला होता. आता 15 वर्षांचा हा वनवास संपवण्याची जबाबदारी रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या विक्रमांना विराटकडून धोका, टी20 विश्वचषकात जाळ अन् धूर संगटच काढणार ‘किंग कोहली’
संघांनो सावधान! टी20 विश्वचषकापूर्वी पावरफुल बनली दक्षिण आफ्रिका, ताफ्यात मॅचविनर पठ्ठ्याची एन्ट्री