इंग्लंडचे माजी यष्टीरक्षक फलंदाज जिम पार्क्स यांचे मंगळवारी (३१ मे) निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. जिम पार्क्स हे इंग्लंडचे सर्वात वयोवृद्ध जिवंत क्रिकेटपटू होते. मागील आठवड्यात घरी असताना घसरून पडल्यानंतर त्यांना जवळच्या वर्थिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ससेक्स या काउंटी क्रिकेट क्लबने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
जिम पार्क्स (Jim Parks) यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ससेक्स काउंटी क्लबचे (Sussex Club) प्रतिनिधित्त्व केले होते. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ससेक्स संघाकडून काउंटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. ससेक्स क्लबने त्यांच्या निधनाचे वृत्त देताना म्हटले आहे की, “ससेक्स क्रिकेटला हे सांगण्यात अतिशय दु:ख होत आहे की, जिम पार्क्स यांचे वयाच्या ९०व्या (Jim Parks Died At 90) वर्षी निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात घरी पडल्यानंतर वर्थिंग रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.”
Sussex Cricket is deeply saddened to announce the death of Jim Parks at the age of 90.
Our thoughts and sincere condolences are with his wife Jenny and son Bobby. RIP, Jim.
— Sussex Cricket (@SussexCCC) May 31, 2022
The thoughts of everyone at the ECB are with the friends, family and loved ones of former @SussexCCC, @SomersetCCC and England wicketkeeper Jim Parks, who has passed away at the age of 90. pic.twitter.com/szeXJLlhHs
— England and Wales Cricket Board (@ECB_cricket) May 31, 2022
जिम पार्क्स यांनी ससेक्स संघाकडून ७३९ प्रथम श्रेणी आणि १३२ अ दर्जाचे सामने खेळले होते. यादरम्यान त्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता. ७३९ प्रथम श्रेणी सामने खेळताना जिम पार्क्स यांनी ३६६७३ धावा केल्या होत्या. तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १३२ सामन्यांमध्ये २८३२ धावा केल्या होत्या.
याखेरीज त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द १४ वर्षांची राहिली. त्यांनी १९५४ ते १९६८ या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. यादरम्यान ४६ कसोटी सामने खेळताना त्यांनी १९६२ धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दीपक चाहर आणि जयाच्या लग्नाची तयारी जोरात, संगीत अन् मेहंदी कार्यक्रमातील Photo होतायत व्हायरल
क्रिकेटर्स मॅचवेळी काय खातात माहित आहे का? घ्या जाणून
विवादात अडकला एमएस धोनी, बिहारमध्ये कॅप्टनकूल विरोधात FIR दाखल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण