पुणे। पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी स्टेडीयम मध्ये 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र या दक्षिण आशियातील एकमेव एटीपी टूर टेनिस स्पर्धेतील दुहेरी गटात रॉबर्ट लिंस्टेड व जोनाथन एरलीच हे माजी ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू खास आकर्षण ठरणार आहेत.
स्वीडनच्या लिंस्टेड याने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. तसेच, त्याने 2010, 2011 व 2012 अशी सलग तीन वर्षे विम्बल्डनची अंतिम फेरीदेखील गाठली होती. टाटा ओपन स्पर्धेत तो हॉलंडच्या रॉबिन हॅसेच्या साथीत विजेतेपदासाठी जबरदस्त आव्हान उभे करणार आहे. विश्वक्रमवारीत 34व्या स्थानावर असलेल्या हॅसेने 2018 मध्ये हॉलंडच्याच मॅटवे मिडलकूपच्या साथीत टाटा ओपन टेनिस स्पर्धेमध्ये दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते.
इस्राईल एलरीचनेही ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 2008 मध्ये जिंकली होती. जागतिक मानांकनात 67व्या क्रमांकावर असलेला एरलीच टाटा ओपन टेनिस स्पर्धेत प्रथमच खेळणार असून बेलारूसचा आंद्रेई व्हेसिलोव्हासकी हा त्याचा दुहेरीतील जोडीदार असणार आहे.
गतवर्षी रोहन बोपन्नाच्या साथीत टाटा ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा भारताचा दिविज शरण यंदा न्यूझीलंडच्या आरटेम सीताकच्या साथीत विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असेल.
अधिक माहिती देताना टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक असलेल्या टाटा ओपन टेनिस स्पर्धेचे हे 25 वर्ष असून अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. आम्ही 10 जोडयाना दुहेरीच्या मुख्य ड्रॉ मध्ये थेट प्रवेश दिला असून चार जोड्याना स्पर्धेच्या ठिकाणीच प्रवेश देण्यात येणार आहे आणि दोन जोडयाना वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देण्यात येणार आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, यंदाच्या वर्षी चुरशीची स्पर्धा होणार असून जगांतील अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होत असल्याने टेनिस शौकिनांना उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळेल, अशी खात्री वाटते. महान खेळाडू लिएन्डर पेससह रोहन बोपन्ना, पूरव राजा, रामकुमार रामनाथन आणि जीवन नेंदूचेझियन हे अव्वल भारतीय खेळाडू मुख्य ड्रॉ मध्ये खेळणार आहेत.
दुहेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूमध्ये एल साल्वाडोरचा मार्सेलो आरेव्हल्लो याचा समावेश असून तो इंग्लडच्या जॉनी ओ’मारा याच्या साथीत खेळणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या अधिकृत पोस्टरचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अनावरण
वाचा👉https://t.co/nlD9TwDQVT👈#म #मराठी #Tennis @MaharashtraOpen— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020
…म्हणून राफेल नदालने किस करत मागितली बॉर्ल गर्लची माफी, पहा व्हिडिओ
वाचा👉https://t.co/cu3sUAz99q👈#म #मराठी #AO2020 #AusOpen #ballgirl #RafaelNadal #Tennis @RafaelNadal— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020