भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाज जावेद मियाँदाद यांच्याबद्दल एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. इरफान पठाण खुलासा केला की, 2003-04 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेल्यावर मियाँदाद यांनी त्याच्याबद्दल असे काही भाष्य केले होते, जे इरफानच्या वडिलांना आवडले नव्हते.
मियाँदाद यांच्या प्रतिक्रियेवर इरफानचे वडील नाराज
इरफान पठाण स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमादरम्यान म्हणाला की, जावेद मियाँदाद यांनी केलेल्या भाष्याचे प्रकरण इतके वाढले की माझे वडील त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट टीम ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले होते. इरफान पठाण पुढे म्हणाला की, कारगिल युद्धानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर चालला होता. मियाँदाद त्यावेळेसचे पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक होते. तेव्हा मियाँदाद म्हणाले होते की, इरफान पठाणसारखा गोलंदाज पाकिस्तानच्या प्रत्येक गल्लीत मिळून जाईल. या प्रतिक्रियेमुळे इरफानचे वडील नाराज झाले होते.
इरफानचे वडील मियाँदाद यांच्या खोलीमध्ये गेले
इरफान पठाणने खुलासा केला की, त्याच्या वडिलांना जावेद मियाँदाद यांनी दिलेली प्रतिक्रिया अजिबात आवडली नव्हती आणि त्यांना मियाँदाद यांना भेटायचे होते. इरफानने पुढे सांगितले की, ‘माझे वडील सामना पाहण्यासाठी पाकिस्तानमध्ये आले होते आणि ते माझ्याकडे येऊन म्हणाले की मला जावेद मियाँदाद यांना भेटायचे आहे. परंतु, मी त्यांना खूप समजावून सांगितले की, आपल्याला त्यांना भेटायची परवानगी नाही. तरीदेखील त्यांनी ऐकले नाहीत आणि ते सरळ ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पोहोचले.’
मियाँदाद यांची इरफानच्या वडिलांनी केली बोलती बंद
इरफान पठाणने सांगितले की, ‘मियाँदाद माझ्या वडिलांना पाहून उठून उभे राहिले आणि म्हणाले की, मी तुमच्या मुलाबद्दल काहीच बोललो नाही.’ इरफानने पुढे सांगितले की, ‘माझे वडील मियाँदादकडे पाहून हसले आणि म्हणाले की मी त्याबद्दल बोलण्यासाठी इथे आलोच नाही. मला फक्त तुम्हाला भेटायचे होते, म्हणून मी इथपर्यंत आलो होतो. कारण तुम्ही एक उत्कृष्ट खेळाडू आहात. म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
अरे व्वा! विराट कोहली आहे शाहिद आफ्रिदीचा आवडता खेळाडू ; ‘हे’ ७ क्रिकेटर्सही यादीत सामील
ऐकलंत का! आयपीएल २०२१ मध्ये श्रेयस अय्यर करतोय पुनरागमन; पण नेतृत्वपद कोणाकडे?