अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध करेल. मात्र, दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झालेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या जागी भारतीय संघाने अद्याप बदली खेळाडूची घोषणा केली नाही. त्यामुळे सध्या तरी भारतीय संघात अधिकृतरित्या केवळ 14 खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघाने चुकीची संघनिवड केल्याचे भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी म्हटले आहे.
माझी भारतीय क्रिकेटपटू डब्ल्यूव्ही रमण यांच्यासोबत एका चॅट शोमध्ये बोलताना अरुण म्हणाले,
“ऑस्ट्रेलियातील मैदानी मोठी आहेत. या ठिकाणी वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. मात्र, भारतीय संघात तीन फिरकीपटूंचा समावेश केला गेलाय. त्यापैकी केवळ एकच जण मैदानात उतरेल. माझ्यामते, उमरान मलिक याला घेऊन जायला हवे होते. तो एक चांगला गोलंदाज असून, त्याच्या गोलंदाजीला फायदेशीर खेळपट्टी मिळाल्यास तो चांगली कामगिरी करतो.”
जम्मू काश्मीरसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या उमरानने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी शानदार गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये सातत्याने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत 22 बळी मिळवले होते. त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.
भारत दुसऱ्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील 2007 मध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा झालेला टी20 विश्वचषक आपल्याला होता. मात्र, तेव्हापासून आजवर पंधरा वर्षांनंतर ही भारतीय संघाला स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आले नाही. 2014 विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेले. भारताने अखेरच्या वेळी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. यानंतर भारताने अनेक स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली, पण विजेतेपद मिळवता आले नाही.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी ‘शो’ सुरूच! षटकार-चौकारांचा पाऊस पाडत ठोकले वादळी शतक; मुंबई 20 षटकात 3 बाद 230
टी20 विश्वचषकापूर्वीच पाकिस्तानची दादागिरी! तिरंगी मालिकेत घरच्याच मैदानावर न्यूझीलंडचा पराभव






