Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“ती काय जॉगिंग करत होती?” माजी भारतीय कर्णधार हरमनप्रीतवर संतापल्या, दिला ‘हा’ धडा

February 25, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter

Photo Courtesy: Twitter


आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून नजीकच्या सामन्यात पराभव झाला. ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाला 5 धावांनी पराभूत केले. या  पराभवानंतर काहींनी महिला संघाला पाठिंबा दिला, तर अनेकांनी टीका केली. भारताच्या माजी कर्णधार डायना एडुलजी यांनी थेट भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यावरच टीकास्त्र डागले.

पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 173 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना भारताला संघर्ष करावा लागला. एकेवेळी असे वाटत होते की, संघाला विजय मिळेल, परंतु हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही धावबाद झाल्यामुळे आशा धुळीस मिळाल्या. हरमनप्रीत ज्याप्रकारे धावबाद झाली त्यावर एडुलजी यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,

“तिला वाटत असेल की, अखेरच्या क्षणी तिची बॅट अडकली. मात्र, मला तर वाटते ती जॉगिंग करत होती. आपली विकेट किती महत्त्वाची आहे हे माहीत असताना देखील, तुम्ही अशा प्रकारे कसे पळू शकता. जिंकण्यासाठी तुम्हाला व्यावसायिक पद्धतीने क्रिकेट खेळावे लागते. एलिस पेरीने अखेरच्या वेळी ज्या प्रकारे डाईव्ह मारून दोन धावा रोखल्या त्याला तुम्ही व्यावसायिकता म्हणू शकता.”

हरमन भारतीय संघाच्या विजयासाठी ‌‌‌‌‌40 धावांची गरज असताना दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होती. पहिली धाव घेतल्यानंतर ती काहीशी संथ झाली. ती दुसरी धाव पूर्ण करणार इतक्यात तिची बॅट मैदानावर अडकली. त्यामुळे ती धावबाद झाली. तिने 34 चेंडूवर 52 धावांची खेळी करताना 6 चौकार व 1 षटकार ठोकला. त्यानंतर इतर फलंदाजांना धावांची गती न राखता आल्याने भारतीय संघाला पाच धावांनी सत्ता पराभव पत्करावा लागला.

(Former India Captain Diana Edulji Slam Harmanpreet Kaur For Her Slow Run In Semifinal Runout)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“फलंदाज नव्हे गोलंदाजांमूळे हरतोय’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने लावला वेगळाच तर्क  
आली लग्नघटिका समीप! सोमवारी शार्दुल चढणार बोहल्यावर, ही आहे ‘लॉर्ड’ची जीवनसाथी


Next Post
Sailing National Championships

पुनरागमनाच्या शर्यतीत दत्तू भोकनळ अंतिम फेरीत

Billiards-Snooker

चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत 30 संघ सहभागी

Photo Courtesy: Facebook/RolandGarros

पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये चार भारतीय खेळाडूंचा सहभाग

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143