भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणार आहे. दरम्यान दोन्ही संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) वैयक्तिक कारणामुळे उपलब्ध नाही. त्यावर आता माझी भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझादने (Kirti Azad) मोठे वक्तव्य केले आहे.
रोहित शर्माने (Rohit Sharma) न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटीत 6 डावात केवळ 91 धावा केल्या होत्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, खराब फॉर्मशी झगडत असलेल्या रोहितबद्दल कीर्ती आझाद (Kirti Azad) म्हणाला की, “होय, ही चिंतेची बाब आहे. रोहित शर्मा बराच काळ भारतीय संघाचा कर्णधार राहिला आहे. पण मी सांगू इच्छितो असा कोणीही नाही, ज्याची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही. रोहित भारतीय संघाचा सर्वात मजबूत दुवा आहे, त्यामुळे आगामी मालिकेत तो चांगली कामगिरी करेल अशी आम्हाला आशा आहे.”
जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आतापर्यंत केवळ 1 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये भारताला इंग्लंडकडून 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तो आता रोहितच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पर्थ कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
जसप्रीत बुमराहच्या कर्णधारपदावर कीर्ती आझाद (Kirti Azad) म्हणाला, “मी कपिल देवसोबत खेळलो आहे, जो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. कर्णधारपदामुळे त्याच्या कामगिरीवर कधीही परिणाम झाला नाही. हे सर्व परिस्थितीवर अवलंबून असते. जर तुमचा संघ चांगली कामगिरी करत आहे आणि तुम्ही केलेले बदल चांगले परिणाम देत असतील तर तुम्ही चांगले कर्णधार आहात, जर बदल तुम्हाला परिणाम देत नसतील तर तुम्हाला तुमच्या कर्णधारपदात सुधारणा करण्याची गरज आहे.”
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
अलविदा नदाल…! 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन त्याच्या शेवटच्या सामन्यात घरच्या चाहत्यांसमोर हरला
आयसीसी क्रमवारीत तिलक वर्माची गरुड झेप; हार्दिक पांड्याला देखील बंपर फायदा
IND vs AUS: प्रशिक्षक माॅर्नी मॉर्केलचा याॅर्कर? पर्थ कसोटीत शुबमन गिलची सरप्राईज एंट्री होणार!