---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील ‘बाप’ खेळाडू वसिम जाफरने केला क्रिकेटला अलविदा

On: शनिवार, मार्च 7, 2020 5:57 PM
---Advertisement---

भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या वासिम जाफरने (Wasim Jaffer) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. शनिवारी (7 मार्च) जाफरने यासंदर्भात घोषणा केली. याचबरोबर 2 दशकांच्या त्याच्या दमदार क्रिकेट कारकिर्दीचा शेवट झाला.

भारताचा माजी फलंदाज जाफरने सांगितले, “सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, वीवीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग आणि एमएस धोनी यांच्यासारख्या खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे.”

42 वर्षीय जाफरने 260 प्रथम श्रेणी सामन्यात 50.67च्या सरासरीने 19410 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 57 शतकांचा आणि 91 अर्धशताकांचा समावेश होता. नाबाद 314 या त्याचा सर्वोत्तम धावा आहेत.

जाफरने 2000 ते 2008च्या दरम्यान 31 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. यावेळी त्याने 5 शतके आणि 11 अर्धशतके ठोकत 1944 धावा केल्या होत्या.  जाफरने 2008मध्ये कानपुर येथे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. याचबरोबर आपल्या 8 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने भारताकडून 2 वनडे सामनेही खेळले होते.

जाफरला देशांतर्गत क्रिकेट विशेषत: रणजी ट्रॉफीतील त्याच्या दमदार प्रदर्शनासाठी ओळखले जाते. रणजी ट्रॉफीत त्याने एकूण 12038 धावा करण्याचा पराक्रम केला आहे. जाफरव्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूने या प्रतिष्ठित खेळात दहा हजारांचा आकडा गाठलेला नाही. जाफरनंतर अमोल मजूमदार 9202 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. शिवाय जाफर हा रणजी ट्रॉफीत 150 सामने खेळणारा पहिला फलंदाज आहे.

मुंबई संघातून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणारा जाफर  बराच काळ संघाचा कर्णधार राहिला आहे. मात्र, 2015-16च्या हंगामापुर्वी तो विदर्भ संघाकडून खेळण्यासाठी गेला. त्याने सलग दोनवेळा (2018 आणि 2019) विदर्भ संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

याचबरोबर जाफरला आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. तो आयपीएल 2020मध्येही पंजाब संघाला प्रशिक्षण देणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---