भारतीय संघ आगामी बांगलादेश सोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी भारताचा माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) बाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनी रोहित आणि विराट दुलीप ट्राॅफीमध्ये खेळणार नाहीत. यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर करत मांजरेकर यांनी लिहिलं की, “गेल्या 5 वर्षांत भारतानं खेळलेल्या 249 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी रोहित शर्मा (Rohit Sharma) 59 टक्के आणि विराट कोहलीनं (Virat Kohli) 61 टक्के सामने खेळले आहेत. तर जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) केवळ 34 टक्के सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत त्याला पुरेशी विश्रांती मिळाली आहे. आणि महत्त्वाच्या सामन्यांच्या सरावासाठी देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्यांची निवड व्हायला हवी होती.”
India has played 249 international matches in the last 5 years. Rohit has played only 59% of those. Virat 61 % & Bumrah 34%. I see them as well rested India players. Could have been selected for the Duleep trophy.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) August 28, 2024
मांजरेकर यांच्या आधी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्रातील आपल्या स्तंभात असंच म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “कोहली आणि रोहित दोघेही वयाच्या तिसऱ्या दशकात आहेत आणि अशा परिस्थितीत दुलीप ट्रॉफीमध्ये खेळून ते आपले कौशल्य वाढवू शकतात आणि मानसिकदृष्ट्या फ्रेश राहू शकतात.”
आगामी दुलीप ट्राॅफीची (Duleep Trophy) सुरुवात (5 सप्टेंबर) पासून होणार आहे. दुलीप ट्राॅफी स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी 4 संघ आहेत. या स्पर्धेत भारताचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. पण भारताचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
ICC Champion’s Trophy 2025: जय शाह हिसकावून घेणार पाकिस्तानचे यजमानपद?
मोठी बातमी! इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती
राजस्थान फ्रँचायझीला मोठा फटका, स्पर्धेपूर्वीच दिग्गज खेळाडू बाहेर