अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्तिथीमध्ये भारतीय संघ जुलैमध्ये श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी आयपीएलमधील उत्कृष्ट प्रदर्शन पाहून अनेक नवीन चेहऱ्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु असे 2 खेळाडू आहे ज्यांची निवड भारतीय संघात न झाल्यामुळे माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दीप दासगुप्ताने नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीलंका दौर्यावर जाणार्या भारतीय संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळायचे आहेत. श्रीलंका दौर्यासाठी शिखर धवनला संघाचा कर्णधारपद देण्यात आले आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. भारताच्या 20 सदस्यीय संघात अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान मिळालं आहे. यात ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, चेतन सकारिया, देवदत्त पडीक्कल अशा खेळाडूंचा समावेश आहे.
मात्र, जयदेव उनाडकट आणि राहुल तेवतिया यांना संघात समाविष्ट न केल्याबद्दल भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज दीप दासगुप्ताने नाराजी व्यक्त केली.
दीप दासगुप्ताने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हटले आहे की, “मला वाटते की या कोरोनाच्या काळात खेळाडूंची निवड खूपच सोपी झाली आहे. भारताला श्रीलंका विरुद्ध सहा सामने खेळायचे आहेत. तीन टी20 आणि तीन वनडे सामने. तुम्हाला २० खेळाडू आणि पाच नेट गोलंदाज निवडावे लागतील. तुम्ही यात अजून काही खेळाडू समाविष्ट करू शकले असते. जयदेव उनाडकट आणि राहुल तेवतिया हे खेळाडूही शेवटच्या मालिकेत संघात समाविष्ट केले गेले होते. 25 ऐवजी 27 खेळाडूंची निवड करण्यास हरकत नाही.”
माजी यष्टिरक्षक फलंदाज दीप दासगुप्ताने जयदेव उनाडकटचा भारतीय संघात समावेश न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी उनादकटचे मेहनची आणि प्रतिभाशाली म्हणून वर्णन केले. वर्ष 2019-2020 च्या रणजी करंडक स्पर्धेत उनाडकटने सौराष्ट्रकडून 67 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने भारतासाठी अखेरचा सामना वर्ष 2018 मध्ये खेळला होता.
दीप दासगुप्ता पुढे म्हणाले, “संघाच्या निवडीबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. तेथे 20 खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंची प्रतिभा होती त्यांना स्थान मिळावे. यात आश्चर्य नाही. जयदेव उनाडकट याला भारतीय संघात जागा मिळावी अशी माझी इच्छा होती कारण तो खूप मेहनती आणि प्रतिभाशाली खेळाडू आहे . फक्त आयपीएलमध्येच नव्हे तर त्याने रणजी ट्रॉफीमध्ये 20-25 षटके फेकली आहेत. त्याने खूप परिश्रम केले आणि चमकदार कामगिरीही केली. मी आधी असेही म्हटले आहे की, तुम्ही 20 ऐवजी 27 खेळाडू निवडले तरी हरकत नाही.”
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सैमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.
महत्वाच्या बातम्या
भारतीय वंशाच्या ‘या’ क्रिकेटपटूंचा पाकिस्तान सुपर लीगमध्ये बोलबाला, रहस्यमयी गोलंदाजाचाही समावेश
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, पण का? इमाम-उल-हक यांनी सांगितले कारण