सध्या भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने एकतर्फी जिंकत केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मालिका आपल्या नावे केली आहे. आता मालिकेतील अखेरचा सामना जिंकून मालिका ३-० अशा फरकाने खिशात घालण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल. त्याचवेळी, या सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्याचे आवाहन भारताच्या माजी क्रिकेटपटूने केले आहे.
यजमान झिम्बाब्वे संघाला खेळाच्या तिन्ही विभागात मात्र युवा भारतीय संघाने मालिका जिंकली आहे. अशा परिस्थितीत बाकावर असलेल्या खेळाडूंना संधी देण्यात यावी असे मत, भारताला २००७ टी२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनुभवी रॉबिन उथप्पाने व्यक्त केले आहे. मागील काही काळापासून सातत्याने भारतीय संघासोबत असलेल्या मात्र संधी न मिळालेल्या ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांच्याबद्दल बोलताना उथप्पा म्हणाला,
“भारतीय संघाने आता मालिका जिंकली आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांना संधी देण्यात यावी. हे दोघेही बऱ्याच काळापासून भारतीय संघासोबत आहेत मात्र त्यांना संधी मिळाली नाही. ईशान किशनला एका डावात फलंदाजी मिळाली आहे. त्यामुळे संघात बदल केला गेल्यास गायकवाड व त्रिपाठी यांना आपला खेळ दाखवता येईल.”
गोलंदाजी विभागाबाबत बोलताना उथप्पा म्हणाला,
“तिसऱ्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णा व मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात यावी. त्यांच्या जागी आवेश खान व दीपक चहर खेळतील. शार्दुल ठाकूर मात्र संघात असेल.”
मालिकेतील अखेरचा सामना २२ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. त्यानंतर भारतीय संघ थेट आशिया चषकात खेळताना दिसेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘संजूची आणखी एखा विक्रमाला गवसणी!’ आता थेट प्रशिक्षक द्रविड अन् धोनीच्या यादीत झाला सामील
‘…पाकिस्तानने ५० षटके घेतली असती’, भारतावर टीका करणाऱ्यांना पाकिस्तानी दिग्गजाचाच टोला