भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्याला मुकावे लागले होते. परंतु त्याला सामना पाहण्यासाठी मुंबईला जाण्यापासून कोणीही अडवू शकले नव्हते. त्यादिवशी भारताने दुसरा विश्वचषक आपल्या नावे केला होता. आता नेहराने आपल्या विश्वचषक अंतिम सामन्यात न खेळण्यामागील कारणाचा खुलासा केला आहे.
न्यूज 18 शी बोलताना त्याने सांगितले की, “मी या अंतिम सामन्यात खेळणार नसल्याचे मला 48 तास अगोदर मला समजले. मी जेव्हा चंदीगड सोडले, तेव्हा मला वाटले की मी या अंतिम सामन्यात खेळू शकेन. पण माझ्या हातावर खूप मोठी सूज आली होती. त्यामुळे मला शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. त्यावेळेस मला क्रिकेटचा पुरेसा अनुभव आला होता, तेव्हा मी जवळजवळ 32 वर्षांचा होतो. त्यागोदर मी 2003 विश्वचषकामध्येही भाग घेतला होता.”
तसेच तो म्हणाला की, “या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलो नसल्याने आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. याअगोदर संघास ज्याप्रकारची मदत हवी होती, ती मदत करण्याचा मी प्रयत्न केला. पण मला माहित होते की आता मी मैदानात जाऊ शकत नाही किंवा क्षेत्ररक्षणही करू शकत नाही. परंतु मी खेळाडूंना पाणी पुरवणायाची तरी सेवा देऊ शकलो. म्हणून मी मुंबईला गेलो.”
मोहालीत झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण सामन्यादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यावेळस तो विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा एक महत्त्वाचा सदस्य होता. तसेच त्याने झहीर खान आणि मुनाफ पटेलच्या वेगवान गोलंदाजी विभागातही योगदान दिले. 2003 मधील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो खेळला होता. परंतु दुर्दैवाने त्यावेळेस भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ मधील राखीव खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन पाहिलीत का? सगळेच आहेत शेरास सव्वाशेर
Video: तू स्टंपवर का चेंडू टाकतोय, आधीच विरोधक बॅकफूटवर आहेत; होल्डरची भर सामन्यात स्लेजिंग
आयपीएल ट्रायलसाठी बारावी बोर्डाची परिक्षा सोडली; आता भल्याभल्यांना आपल्या फिरकीने करतोय गारद