---Advertisement---

“विनेशला रौप्य पदक मिळायला हवं” सीएएसच्या सुनावणीपूर्वी माजी कर्णधाराचं मोठं वक्तव्य

On: रविवार, ऑगस्ट 11, 2024 6:25 PM
---Advertisement---

बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी विनेश फोगटला (Vinesh Phogat) 100 ग्रॅम जास्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. विनेश फोगटने (Vinesh Phogat) 50 किलो महिला कुस्तीमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु पदक निश्चित होण्यापूर्वीच तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यावर आता माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीनं प्रतिक्रिया दिली आहे.

माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला की, “मला नेमके नियम माहित नाहीत, पण मला खात्री आहे की जेव्हा ती अंतिम फेरीत पोहोचली तेव्हा ती योग्यरित्या पात्र ठरली असेल. त्यामुळे जेव्हा तुम्ही अंतिम फेरीत जाल तेव्हा तुम्हाला सुवर्णपदक मिळते. तिला (विनेश) अयोग्यरित्या अपात्र ठरवण्यात आले की नाही, मला माहित नाही, पण ती किमान रौप्य पदकासाठी पात्र आहे.”

विनेश फोगट 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार होती. परंतु अंतिम सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर तिनं किमान रौप्य पदक मिळावं, यासाठी अपील केलं आहे. यावर सीएएसचा निर्णय येणं बाकी आहे. 9 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये या प्रकरणाची सुनावणी 3 तास चालली, परंतु अद्याप यावर निर्णय झालेला नाही.

सुनावणीनंतर सीएएसनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, या निर्णयाची अंतिम मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, परंतु शनिवारीही यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं सांगितलं होतं की, या मुद्द्यावर निर्णय 10 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता घेतला जाईल. परंतु त्यानंतर ही मुदत 13 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“तेव्हाच मला समजलं होतं, सचिनचं भविष्य उज्ज्वल आहे”, वेंगसरकरांचा जुन्या आठवणींना उजाळा
आश्चर्यकारक! स्टंपला चेंडू लागला तरीही फलंदाज बाद नाही, पाहा VIDEO
धाडसी फलंदाज, भारताच्या मधल्या फळीचा कणा! 1983 वर्ल्डकप विजयाच्या हिरोचा आज वाढदिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---