– निलेश पवार
हर्षा भोगले म्हणतो लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडमध्ये भारतासाठी २ ऐतिहासिक घटना घडल्या आणि तेथील बाल्कनी या दोन्ही अविस्मरणीय घटनांची साक्षीदार आहे. कपिल देवने १९८३चा विश्वचषक जिंकल्यावर संघाने केलेला जल्लोष आणि २००२ साली सौरव गांगुलीने नेटवेस्ट सिरीज जिंकल्यावर जर्सी काढून केलेला जल्लोष. दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन घटना.
क्रिकेटच्या पंढरीत असे करणे योग्य नव्हे असे जेफ्री बॉयकॉटने सांगितल्यावर त्याच उत्तर होत “तुमच्या एका खेळाडून सुध्दा वानखेडेवर अस केले होते. जर लॉर्डस तुमच्या क्रिकेटची पंढरी आहे तर वानखेडे आमची पंढरी आहे.”
सौरव चंडिदास गांगुली एक बंगाली क्रिकेटर. खरतर बंगाली माणसे म्हणजे शांत माणसे. परंतु हा एक अवलिया क्रिकेटमधला सर्वात आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जातो. विसाव्या दशकाच्या सुरुवातीलाच मॅच फिक्सिंगच प्रकरण चव्हाट्यावर आले आणि भारतीय संघातील खेळाडूंवर सुध्दा आरोप झाले. अशा वेळी त्या काळात नवख्या असणाऱ्या गांगुलीकडे कर्णधारपद सोपवले गेले.
संघातील जुन्या नव्या खेळाडूंना एकत्र करुन एक मजबून संघ बनवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती आणि त्याने ती चोख बजावली. आक्रमक, दर्जेदार अशा खेळाडूंना पारखण्यामध्ये तो तरबेज होता. सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग आणि तो स्वतः ह्या पंचकाला त्यावेळी मोठे मोठे गोलंदाज घाबरायचे. युवराज, गंभीर पासून ते धोनी पर्यंत अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्याचे कामही त्याने चोख बजावले.
तो खेळाडू म्हणूनही तेवढाच आक्रमक होता. एक अष्टपैलू खेळाडू संघाला गरज असताना कितीतरी वेळा आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने सुखरुप बाहेर काढले तसेच गोलंदाजीनेही त्याने अनेकवेळा सामने जिंकण्यास मदत केलीय. हा डावखुरा फलंदाज ऑफ साईडला फटके मारण्यात एवढा पटाईत होता की त्याला “ऑफसाईडचा देव” असे म्हणतात.
त्याच्या बेधडक खेळामुळे आणि नेतृत्वगुणांमुळेच त्याला ‘दादा’ या टोपणनाव सर्व खेळाडू हाक मारत. अशा या दादागिरी करुन मैदान गाजवणार्या दादा खेळाडूला ४९ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!