श्रीलंका क्रिकेट संघाने गेल्या काही महिन्यांपासून निराशाजनक कामगिरी केली आहे. नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे आणि टी-२० मालिकेत देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतरही त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. क्रिकेटच्या मैदानावर पराभवाचा सामना करत असलेल्या श्रीलंका संघासोबत मैदानाबाहेरही असे काही घडले आहे, ज्यामुळे सर्व खेळाडू आणि चाहत्यांचा थरकाप उडाला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, श्रीलंकन संघ परतीचा प्रवास करताना विमानातील इंधन संपले होते. ज्यामुळे विमान भारतातच उतरवण्यात आले आहे. श्रीलंका संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थरने टॉक स्पोर्ट्ससोबत चर्चा करताना म्हटले की, “आमचे विमान भारतात उतरवावे लागले. कारण त्याचे इंधन संपले होते. जेव्हा आमचे विमान भारतात उतरले तेव्हा मला इंग्लंडचे ऑपरेशन मॅनेजर वेन बेंटली यांचा मेसेज आला होता. त्यांनी मला विमानातील इंधन संपल्याची बातमी दिली होती. हे कळताच संपूर्ण संघ तणावात आला होता.” (Srilankan team scared after flight fuel loss says Mickey arthur)
श्रीलंकेला पोहोचला संघ
आता इंग्लंडहून परतलेला संघ श्रीलंकेत सुखरूप पोहोचला आहे. सध्या श्रीलंकन संघातील खेळाडू विलगिकरणात आहेत. इंग्लंडहून परतलेल्या संघातील खेळाडूंना श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने विलगिकरणात राहण्याचे आदेश दिले आहेत. कारण इंग्लंड संघातील ३ खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफमधील ४ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.
येत्या १३ जुलैपासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्ड कुठलाही जोखीम घेणार नाही. त्यांनी खेळाडूंची एंटीजन चाचणी केली आहे. आता खेळाडूंची आरटी-पीसीआर अहवाल येण्याची वाट पाहिली जात आहे.
असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १३ जुलै
२) दुसरा वनडे सामना – १६ जुलै
३) तिसरा वनडे सामना – १८ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २१ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २२ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २५ जुलै
महत्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
माजी बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर बनले भारताचे नवे क्रीडामंत्री, रवी शास्त्रींनी केले अभिनंदन
मन जिंकलं! टीम इंडियासह आपला २१ वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी पडीक्कलने धोनीला दिल्या खास शुभेच्छा