---Advertisement---

धक्कादायक! ‘या’ माजी प्रशिक्षकाने भारतीय खेळाडूंना सामन्यापूर्वी चक्क सेक्स करण्याचा दिला सल्ला

On: शुक्रवार, जुलै 2, 2021 10:04 AM
---Advertisement---

भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. दिग्गज खेळाडूंनी भरलेल्या या संघाचे मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन होते. मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना अनेक गोष्टी हाताळण्यासाठी वेगवेगळे सल्ले देत असतात. परंतु त्यांनी दिलेल्या एका सल्ल्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. काय होता तो सल्ला  चला पाहूया.

भारतीय संघाला दिला होता सेक्स करण्याचा सल्ला
भारतीय संघाचे मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना चक्क सेक्स करण्याचा सल्ला दिला होता. परंतु पॅडी यांनी म्हटले होते कि, सल्ला दिल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी निराशा व्यक्त केली होती. गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०११ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. हा सल्ला दिल्यानंतर पॅडी यांनी गॅरी यांची माफी मागितली होती. (former indian coach given advice to indian players to have sex before the match)

सेक्सच्या मुद्द्यावर झाला होता मोठा वाद
पॅडी यांच्या म्हणण्यानुसार, सेक्सच्या मुद्द्यावरून मोठा वाद झाला होता. पॅडी यांनी सामन्यापूर्वी  खेळाडूंना सेक्स करण्याचा सल्ला दिला होता. परंतु यामागचे कारण देखील त्यांनी सांगितले होते. पॅडी यांनी आपल्या पुस्तकात ‘द वॉल’ राहुल द्रविड पासून ते गौतम गंभीर पर्यंत सर्व खेळाडूंचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे कि, २००९ मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्ध्येची तयारी करत असताना ते नोट्स तयार करत होते, ज्यामध्ये त्यांनी सेक्स करण्याचे फायदे देखील लिहिले होते.

शारीरिक संबंध बनवल्यामुळे प्रदर्शनात फरक पडतो का?
प्रशिक्षक पॅडी यांनी ‘ईगो एंड माय ग्रेटेस्ट प्रोफेशनल एरर’मध्ये आपल्या नोट्सचा उल्लेख केला आहे. त्यांनी खेळाडूंसाठी तयार केलेल्या नोट्स मध्ये लिहिले होते कि, ‘सेक्स केल्याने प्रदर्शनात फरक जाणवतो का? तर होय, प्रदर्शनात फरक जाणवतो.’

धोनीचे केले कौतुक
माजी प्रशिक्षकाने हे हि सांगितले कि, आयपीएल स्पर्धेदरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना शिवी दिली होती. तसेच माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचे कौतुक करताना ते म्हणाले कि, ‘धोनीची विशेषता त्याची शांतता आहे. सामन्यातील परिस्थिती कशीही असो, तो नेहमीच शांत असतो.’

महत्वाच्या बातम्या-

मॅच फिक्सिंगच्या आपोरात दोषी आढळले ‘हे’ २ क्रिकेटपटू, आयसीसीने ८ वर्षांसाठी केले बॅन

माजी क्रिकेटरचा छातीठोक दावा; म्हणाले, ‘शास्त्रीनंतर द्रविडच असणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक’

बड्या खेळाडूला सापडली टीम इंडियाची ‘कमजोर बाजू’, इंग्लंड घेणार भरपूर फायदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---