दक्षिण अफ्रिकेने एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत दारुण पराभव केल्यानंतर भारतीय संघाला (Team India) फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशातील मालिका खेळायची आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळली जाईल. तत्पूर्वी, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
शास्त्रींच्या मते द्रविडने संघातील युवा खेळाडूंवर अधिक लक्ष दिले पाहिजे, कारण ते पुढच्या ४-५ वर्षांपर्यंत संघासोबत खेळू शकतात.
पाकिस्तान संघाच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरसोबत शास्त्री त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होते. त्यावेळी शास्त्री म्हणाले की, “पुढचे ८-१० महिने भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्वाचे आहेत. या काळात सर्व खेळाडूंना ओळखणे गरजेचे असेल, जे तुम्हाला ४-५ वर्ष पुढे घेऊन जातील. मला नेहमी वाटते की, संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असायला पाहिजे.”