बॉर्डर गावसकर (Border Gavaskar Trophy) मालिकेत भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) धावा काढण्यासाठी धडपडत आहेत. मेलबर्न कसोटीत भारताच्या पराभवानंतर चाहत्यांमध्ये ‘रोहिराट’च्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, विराट, रोहितच्या भविष्यावर माजी भारतीय प्रशिक्षकाने मोठे वक्तव्य केले आहे.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचे मत आहे की, विराट कोहलीमध्ये अद्याप 3 ते 4 वर्षांचे क्रिकेट बाकी आहे, पण कर्णधार रोहित शर्माला खेळाच्या पारंपारिक फॉरमॅटमध्ये फॉर्म आणि तंत्राचा दीर्घकाळ संघर्ष करता येऊ शकतो. या मालिकेनंतर तुमच्या भविष्याचे आकलन करण्याची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीमुळे भारताचे दिग्गज फलंदाज रोहित आणि विराट यांना टीकेला सामोरे लागले आहे. रोहितने 5 डावांमध्ये 6.20च्या सरासरीने केवळ 31 धावा केल्या आहेत. त्याने 3, 6, 10, 3 आणि 9 धावा केल्या आहेत, जी ऑस्ट्रेलियन भूमीवरील कोणत्याही विदेशी कर्णधाराची सर्वात कमी सरासरी आहे.
पर्थ कसोटीत शतक झळकावल्यानंतरही विराट कोहलीचे सातत्य टीकले नाही. त्याने आतापर्यंत या मालिकेत 5, 100 नाबाद, 7, 11, 3, 36 आणि 5 धावांची खेळी केली आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना सांगितले की, “मला वाटते की विराट काही काळ खेळेल, तो ज्या प्रकारे आउट होत आहे, ते विसरून जाईल किंवा इतर गोष्टी काहीही असो, मला वाटते की तो आणखी 3-4 वर्षे खेळेल.”
पुढे बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “जोपर्यंत रोहितचा संबंध आहे, त्याला निर्णय घ्यायचा आहे, मला वाटते की, त्याचे फूटवर्क सारखे नाही, त्याला कधीकधी शॉट्स खेळायला उशीर होतो, त्यामुळे मालिकेच्या शेवटी त्याला निर्णय घ्यावा लागेल. त्याचा पुढचा पाय चेंडूकडे पाहिजे तसा जात नसल्याचे आपण मालिकेत अनेकदा पाहिले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
कोणाला मिळणार ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार? या 4 खेळाडूंची नावे शाॅर्टलिस्ट
IND vs AUS; “त्याने स्वत: समजून घेणे…” रिषभ पंतबद्दल काय म्हणाला भारतीय कर्णधार?
मेलबर्नमधील लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया, म्हणाला…