क्रिकेट आणि कलाविश्व यांचे खूप जुने नाते राहिले आहे. भारतीय संघाचे अनेक खेळाडू वेगवेगळ्या शोमधून टीव्हीवर झळकत असतात. जाहिराती असो किंवा रियॅलिटी शो असो, यामधून ते चर्चेचा भाग ठरत असतात. अशात भारतीय संघाचा माजी खेळाडू अजय जडेजा याचाही समावेश झाला आहे. प्रसिद्ध पण तितकाच वादग्रस्त असलेला ‘बिग बॉस‘ शोच्या ओटीटी सीझन 2 शनिवारपासून (दि. 17 जून) सुरू झाला आहे. या शोमध्ये जडेजा झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. जडेजा या शोचा भाग होत असल्यामुळे क्रिकेटप्रेमींचे लक्षही या शोकडे असणार आहे.
काय म्हणाला जडेजा?
सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) या शोचा भाग बनण्यासाठी अजय जडेजा (Ajay Jadeja) खूपच उत्सुक आहे. तो म्हणाला की, “मी भारताच्या सर्वात मोठ्या रियॅलिटी शोचा भाग बनण्यासाठी खूपच उत्सुक आहे. हा माझ्यासाठी नवीन अनुभव आहे. कारण, हा क्रिकेटपासून वेगळा खेळ आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये जिथे संपूर्ण देश तुमचा खरा चेहरा ओळखतो आणि प्रत्येक विचारावर प्रश्न उपस्थित करतो, मी या अनुभवासाठी खूपच उत्सुक आहे.”
बिग बॉस ओटीटी 2चे इतर अधिकृत स्पर्धक
अविनाश सचदेव, पलक पुरसवानी, आलिया सिद्दीकी, अभिषेक मल्हान, आकांक्षा पुरी, जिया शंकर, पुनीत कुमार, बेबिका धुर्वे, फलक नाज, श्रुती सिन्हा, जेद हदीद
जडेजावर फिक्सिंगचा आरोप
खरं तर, अजय जडेजा याच्यावर फिक्सिंगचा आरोप लागला होता. तसेच, सन 2000मध्ये या प्रकरणी त्याच्यावर 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर जडेजा पुन्हा कधीच भारतीय संघाचा भाग बनवू शकला नाही.
जडेजाची कारकीर्द
जडेजाने 1992 ते 2000 अशी 8 वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने 15 कसोटी सामने आणि 196 वनडे सामने खेळले. कसोटीत त्याने 26.18च्या सरासरीने 4 अर्धशतकांसह 576 धावा केल्या. तसेच, वनडेत त्याने 37.22च्या सरासरीने 5359 धावा केल्या. या धावा करताना त्याने 6 शतके आणि 30 अर्धशतकेही झळकावली आहेत. (former indian cricketer ajay jadeja will be part of big boss ott season 2 know here)
महत्वाच्या बातम्या-
सर्वोत्तम कसोटी कर्णधारांमध्ये गणला जाणारा दिग्गज रोहितविषयी स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘त्याला आराम…’
अंकित बावणे ठरला MPL चा पहिला शतकवीर, कोल्हापूर टस्कर्सचा रत्नागिरी जेट्सवर रोमहर्षक विजय