---Advertisement---

“आगामी सामन्यात शमीला सलामीला पाठवा,” कर्णधार राहुलच्या रणनितीवर भडकला भारतीय दिग्गज

On: सोमवार, एप्रिल 19, 2021 12:20 PM
KL-Rahul-Mayank-Agarwal
---Advertisement---

पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवार रोजी (१८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल संघाने पंजाब किंग्ज संघाला ६ गडी राखून पराभूत केले आहे. या पराभवानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहराने केएल राहुलवर संताप व्यक्त केला आहे. यासोबतच त्याने एक सल्ला देखील दिला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहराने क्रीकबजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “काही अशा गोष्टी आहेत, जे खेळाडू या खेळाच्या प्रकारात करू पाहतात. तुम्हाला चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण करावे लागते. तुमचे कधी वाईट दिवस सुरू असतात तर कधी चांगले दिवस असतात. हा एक खेळाचा भाग आहे. परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या नियंत्रणात आहेत. निदान त्या तरी नियंत्रित ठेवा.”

“तुम्ही तुमच्या संघातील सर्वात महागड्या परदेशी गोलंदाजाला गोलंदाजी दिली नाही. मेरेडिथ देखील १० व्या षटकानंतर गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने आपल्या पहिल्याच षटकात स्टीव्ह स्मिथला बाद केले होते. यासोबतच शमीने देखील ४ षटक वेगळ्या स्पेलमध्ये टाकले. तुम्ही जर अर्शदीपसोबत सुरुवात केली तर तुम्ही या सामन्याला कुठून नियंत्रित करणार फ्रंटएंड या बैकएंडने??” असा प्रश्न देखील त्याने उपस्थित केला आहे.

तसेच तो पुढे म्हणाला की, “जर अशीच रणनिती असेल तर केएल राहुलने सलामी फलंदाजी न करता, जलज सक्सेना, शाहरुख खान किंवा शमीला पाठवले पाहिजे. राहुलला अनिल कुंबळे सोबत बसून चर्चा करण्याची आवश्यकता आहे. तसेच रणनिती सोबत मैदानात येणे गरजेचे आहे. जे या सामन्यात दिसून आले नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘हे’ आहे शिखर धवनच्या तुफान फटकेबाजी मागचे गुपीत, स्वत:च सांगितली ‘राज की बात’

हिम्मत तर पाहा गड्याची! अर्शदीपने धवनपुढेच केली त्याच्या सेलिब्रेशनची ‘कॉपी’, एकदा व्हिडिओ पाहाच

चिडका शमी! धवनने नको म्हटले असतानाही मुद्दाम टाकला चेंडू अन् पडला तोंडघशी, बघा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---