भारतातील पश्चिम बंगाल राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. या निवडणूकांमध्ये भारताचे काही क्रिकेटपटूही उभे राहिले होते. त्यात माजी गोलंदाज अशोक दिंडाचाही समावेश होता. दिंडाने यंदाच्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मोयना मतदार संघातून निवडणूक लढवली होती. आता भाजपच्या विश्वासावर खरे उतरत त्याने शानदार विजय मिळवला आहे.
या निवडणूकीत दिंडाने तृणमूल काँग्रेस पक्षाचा उमेदवार संग्राम कुमार डोलाईला पराभूत केले आहे. दिंडाला एकूण १०८१०९ मते मिळाली, तर डोलाईला १०६८४९ मते मिळाली. विजयानंतर दिंडाने म्हटले की, “माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी मोयनातील जनतेचे खूप खूप आभार. मी मोयनातील रहिवास्यांच्या अपेक्षांवर खरा उतरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल.”
आयपीएलचा आतापर्यंतचा इतिहास काढला तर, या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ट्रोलिंग कोणाच्या वाट्याला आली असेल तर, क्रिकेटप्रेमी एक नाव एकमुखाने घेतील ते नाव म्हणजे अशोक दिंडा.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीपुर्वी दिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत फेब्रुवारी महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. दिंडाने पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि पक्षाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते. त्यानंतर त्याने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि जगाने ट्रोल केलेल्या या गोलंदाजाच्या हाती पहिल्याच प्रयत्नात यश आले.
আমার ওপর বিশ্বাস এবং ভরসা রাখার জন্য ময়নার প্রতিটি মানুষকে অসংখ্য ধন্যবাদ 🙏🏼
এই জয় ময়নার প্রতিটি মানুষের জয়।আগামী দিনে ময়নার উন্নয়নের লক্ষ্যে কাজ করাই আমার সংকল্প।#SonarMoyna pic.twitter.com/fUzyWX5yuS
— Ashoke Dinda (@dindaashoke) May 2, 2021
Thankyou Moyna for believing in me pic.twitter.com/tGHDD4l9VO
— Ashoke Dinda (@dindaashoke) May 3, 2021
दिंडाची क्रिकेटमधील कामगिरी
दोन महिन्यांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या दिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट शेवटचे ७ वर्षांपूर्वी खेळले आहे. जानेवारी २०१३ साली इंग्लंडविरुद्ध खेळलेला वनडे सामना त्याचा कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने भारताकडून १३ वनडे सामने आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्याने अनुक्रमे १२ आणि १७ विकेट्स घेतले आहेत.
याशिवाय दिंडाने त्याच्या कारकिर्दीत ११६ प्रथम श्रेणी सामन्यात २८.२८ च्या सरासरीने ४२० बळी घेतले आहेत. १२३ धावांत ८ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने २६ वेळा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. तर ५ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरी त्याच्या नावे आहे.
त्यातील ९० प्रथम श्रेणी सामने त्याने बंगालसाठी खेळले असून यात त्याने २७.५३ च्या सरासरीने ३३९ विकेट्स घेतल्या आहेत. तो बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
याशिवाय दिंडाने ९८ अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यांमध्ये १५१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात दिंडाने १४७ सामन्यात १५१ विकेट्स घेतल्या आहेत. त्यातील ७८ आयपीएल सामन्यांमध्ये त्याने ६९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पश्चिम बंगाल निवडणूक : माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक दिंडावर हल्ला
मोदींना साथ देणार दिंडा! माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने केला बीजेपीत प्रवेश
पृथ्वी शॉच्या विचित्र थ्रोमुळे रिषभ पंत घाबरला, ‘असा’ केला शेवटच्या क्षणी बचाव; पाहा तो प्रसंग