---Advertisement---

भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटरची तब्येत नाजूक, आहे व्हेंटिलेटरवर सपोर्टवर

On: शनिवार, ऑगस्ट 15, 2020 5:54 PM
---Advertisement---

मुंबई । माजी भारतीय क्रिकेटपटू चेतन चौहान यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या महिन्यात त्यांना कोरोना झाला होता. त्यांनंतर लखनौच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु कोरोनातून बरे होण्यापूर्वी त्यांना किडनी आणि रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांना व्हेंटिलेटरमध्ये ठेविण्यात आले.

चेतन चौहान यांनी सुनील गावस्करांबरोबर सलामीला खेळताना भारताला अनेक सामन्यात चांगली सुरुवात करून दिली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना त्यांनी मिळून तीन हजार धावा केल्या. 1979 मध्ये ओव्हल येथे दोघांची भागीदारी संस्मरणीय मानली जाते. या जोडीने 213 धावांची भागीदारी रचली होती.

73 वर्षीय चेतन यांनी 1969 मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 1978 मध्ये त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताकडून त्यांनी 40 कसोटी आणि 7 वनडे सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये 2 हजाराहून अधिक धावा केल्या तरीही चेतन चौहानच्या नावावर एकही शतक नाही. कसोटी क्रिकेटमधील एकही शतक न करता इतिहासात 2 हजाराहून अधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू होता. वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी 153 धावा केल्या आहेत.

रणजी क्रिकेटमध्ये दिल्ली आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चेतन चौहानने बऱ्याच धावा केल्या आहेत. चेतन यांनी 179 प्रथम श्रेणी सामन्यांत 40.22 च्या सरासरीने 11 हजार 143 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 21 शतके आणि 59 अर्धशतके झळकावली आहेत.

त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध 1981मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या दौर्‍यानंतर त्यांना संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर ते कधीही आपल्या संघात परतले नाहीत. निवृत्तीनंतर काही काळ ते क्रिकेट समालोचक म्हणून काम केले. यासोबतच दिल्ली राज्य क्रिकेट संघटनेच्या विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलचे प्रायोजक होण्यासाठी आणखी दोन कंपन्यांनी दाखवला इंटरेस्ट

आयपीएल टीमला आलं टेन्शन, या कारणाने ऑस्ट्रेलिया इंग्लंडचे खेळाडू नाही खेळणार पहिल्या आठवड्यात

‘कॅप्टन कूल’ धोनीचा स्वॅग पाहिलाय का?, आलिशान गाडीतून पोहोचला एअरपोर्टवर

ट्रेंडिंग लेख –

भारताच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेले ३ भारतीय क्रिकेटपटू

कोण होणार कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० चा किंग?

१५ ऑगस्ट दिवशी भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांचा लागला हा निकाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---