होळकर क्रिकेट स्टेडिअम, इंदोर येथे 1 मार्चपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मध्ये पाहुण्या संघाला नमवत भारताने 2-0ने मालिकेत आघाडी घेतली आहे. अशात भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या चुकीबद्दल सांगितले आहे. त्याने ऍश्टन एगर याचे नाव घेत त्याला दुर्लक्षित करणे ऑस्ट्रेलियाची मोठी चूक असल्याचे म्हटले.
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघ सराव सामना न खेळताच मैदानात उतरला होता. ऑस्ट्रेलियाने दावा केला होता की, सिडनी आणि कर्नाटकच्या अलूरमधील शिबीर त्यांच्यासाठी पुरेसे होते. ऑस्ट्रेलियाने काही आश्चर्यकारक निर्णय घेतले, ज्यामध्ये फलंदाज ट्रेविस हेडला नागपूर कसोटीपूर्वी बाहेर बसवण्याचा समावेश होता. ऑस्ट्रेलिया संघाला पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी गमवावा लागला होता.
‘ऍश्टन एगरला न खेळवणे ऑस्ट्रेलियाची मोठी चूक’
मात्र, हरभजन सिंग (Harbhajan Singh) याला वाटते की, नागपूर कसोटीसाठी फिरकीपटू ऍश्टन एगर (Ashton Agar) याला संघात सामील न करणे ही मोठी चूक होती. हरभजन त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी चूक एगरला नागपूर कसोटीसाठी अंतिम अकरामध्ये न खेळवणे होती. ऑस्ट्रेलिया संघाने फिरकीपटू ऍश्टन एगरला मुक्त केले होते, पण तो चांगला पर्याय ठरू शकला असता. ऑस्ट्रेलियाने दोन्ही फिरकीपटूंचा वापर केला, जी मोठी चूक होती. एगर एक प्रतिभावान गोलंदाज आहे.”
विशेष म्हणजे, 1 मार्चपासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पॅट कमिन्सशिवाय उतरणार आहे. कमिन्सच्या जागी संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) करणार आहे. संघ व्यवस्थापनाने एगरला घरगुती क्रिकेट सामने खेळण्यासाठी मायदेशी पाठवले आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या निवडकर्त्यांनी एगरला हटवण्याच्या निर्णयाचा बचाव केला आहे. एगर हा पश्चिम ऑस्ट्रेलियासाठी 2 मार्च रोजी पुढील शेफील्ड शील्ड सामन्यात आणि 8 मार्च रोजी मार्श कपचा अंतिम सामना खेळणार आहे. (former indian cricketer harbhajan singh said ignoring agar for nagpur test was australia big mistake)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हरमनच्या रनआऊटची चर्चा थांबेना! बाद करणारी खेळाडू म्हणतेय, “तिने बेजबाबदारपणा दाखवला”
मोठी बातमी! क्रिकेट खेळताना मैदानावरच कोसळला खेळाडू, उपचारापूर्वीच निधन, सहकाऱ्यांना धक्का