भारताचे माजी क्रिकेटपटू जाकॉब मार्टिन यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. सध्या त्यांची परिस्थिती गंभीर असून उपचारासाठी पैसे कमतरता भासत आहे. यासाठी त्यांच्या कुटुंबाने क्रिकेटच्या सदस्यांकडे मदतीची अपेक्षा केली आहे.
मार्टीन हे बडोदा संघाचे माजी प्रशिक्षक आहेत. तसेच त्यांनी बडोदा संघाचे नेतृत्वही केले आहे. ते भारतीय संघाचे अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांचे बडोदा संघातील पहिले कर्णधार होते.
बीसीसीआय आणि बडोदा क्रिकेट संघटनेचे पूर्व सचिव संजय पटेल हे मार्टीन यांच्या उपचाराकरीता आर्थिक मदतीसाठी पहिले पुढे आले होते. तसेच बीसीसीआयने पाच लाख तर बडोदा क्रिकेटने तीन लाख रूपयांची मदत केली आहे.
बडोदा क्रिकेट संघाकडून समरजीत सिंग यांनीही एक लाख रूपयांची मदत देऊ केली आहे. मात्र मार्टीन यांचा उपचाराचा खर्च जवळपास 11 लाख रूपये असून हॉस्पिटलने त्यांच्यावर औषधोपचार करण्यास मनाई केली होती पण बीसीसीआयने बाकी रक्कम दिल्यावर त्यांच्यावरील उपचार सुरू करण्यात आले आहे.
याबरोबरच भारताचे माजी क्रिकेटपटू झहिर खान, मुनाफ पटेल, सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांनी देखील मार्टिन यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
मार्टिन हे भारताकडून 2 वर्षात 10 वनडे सामने खेळले आहेत. यात त्यांनी 22.57 च्या सरासरीने 158 धावा केल्या आहेत.
त्यांनी 1998-99 च्या मोसमात बडोदाकडून 1000 पेक्षाही अधिक धावा काढल्या होत्या. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांनी विंडीज विरुद्ध टोरोंटो येथे सप्टेंबर 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले होते.
त्यानंतर ते 2002-03 चा मोसम रेल्वेकडून खेळले पण यानंतर पून्हा ते बडोदा संघाकडे परतले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 138 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्यांनी 46.65 च्या सरासरीने 9192 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर
–वनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर
–तब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक