भारतीय क्रिकेटमध्ये सध्या भूकंप झाला आहे. वनडे संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीची (Virat Kohli Removed As ODI Captain) हकालपट्टी झाल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये त्याची चर्चा सुरू असून, कोहलीच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर हा मुद्दा अधिकच तापला आहे. भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असला तरी, आजी-माजी खेळाडू यावर व्यक्त होत आहेत. १९८३ मध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्यावहिल्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी या मुद्द्यावरून थेट निवड समितीला लक्ष केले आहे.
कर्णधारपदाचा वाद सुरू
रोहित शर्मा याच्याकडे वनडे संघाचे नेतृत्व दिल्याने विराट कोहली खुश नसल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे. विराटने स्वेच्छेने टी२० संघाचे नेतृत्व सोडले होते. मात्र, वनडे व कसोटी संघाचे नेतृत्व तो करत होता. परंतु, बीसीसीआयने अचानक रोहित याला वनडे संघाचे कर्णधारपद देखील देऊ केले. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये विराट विरुद्ध रोहित असा अप्रत्यक्ष वाद सुरू झालेला दिसतो. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तोंडावर रोहित दुखापतग्रस्त होऊन कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यानंतर मात्र विराट कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर हा वाद विरुद्ध विराट असा झाला. बीसीसीआय दावा करत असल्याप्रमाणे आपल्याशी कोणीही चर्चा केली नसल्याचे विराट याने म्हटले होते. (India Tour Of South Africa)
काय म्हणाले कीर्ती आझाद
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकलेल्या १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य व माजी खासदार कीर्ती आझाद यांनी या प्रकरणावर भाष्य केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी थेट निवड समितीला लक्ष केले. आझाद म्हणाले,
“तुम्ही नेतृत्वात बदल करता तेव्हा याची कल्पना बीसीसीआय अध्यक्षांना दिली जाते. विराट नक्कीच नाराज नसेल मात्र त्याला ज्याप्रकारे हटवण्यात आले त्यामुळे तो दुःखी झाला असणार. आत्ताची निवड समिती नक्कीच सक्षम आहे. मात्र, इमानदारीने सांगायचे झाल्यास या सर्वांनी मिळून विराटने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या निम्मेही सामने खेळले नसतील.”
सध्या या प्रकरणी विराट व्यतिरिक्त कोणीही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, बीसीसीआयचे काही पदाधिकारी याबाबतीत विराटला कल्पना दिली होती अशी खासगीत व्यक्त व्यक्त करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
गौतम गंभीर आता दिसणार मेंटॉरच्या भूमीकेत, ‘या’ संघाने सोपवली मोठी जबाबदारी
हरभजनच्या गोलंदाजीवर अमिताभ बच्चन यांची फटकेबाजी अन् इरफानची कॉमेंट्री, व्हिडिओ व्हायरल
रुटचा २०२१ वर्षात डंका! विव रिचर्ड्स, ग्रॅमी स्मिथ सारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान