---Advertisement---

भारतीय दिग्गज नवजोत सिंग सिद्धू बनले पंजाबचे नवे ‘कॅप्टन’, सोनिया गांधींकडून शिक्कामोर्तब

On: सोमवार, जुलै 19, 2021 7:28 AM
Navjot Singh Sidhu
---Advertisement---

पंजाब काँग्रेसमध्ये चालू असलेल्या मंत्र्यांच्या विवादावर शेवटी तोडगा निघाला आहे. कॉंग्रेस पक्षाने माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांची पंजाब प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्याचबरोबर पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार कार्यकारी अध्यक्ष्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी केसी वेणुगोपाल यांनी एक पत्र जाहीर केले आहे. यामध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतल्याचे पत्रात लिहिले आहे.

पंजाब राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून संगतसिंग, सुखविंदरसिंग डॅनी, पवन गोयल आणि कुलजितसिंग नगरा यांची निवड करण्यात आली आहे. म्हणजेच आता हे स्पष्ट झाले आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री असणार आहेत आणि नवजोत सिंह सिद्धू हे पंजाब राज्यात कॉंग्रेसचे नेतृत्व करतील.

त्याचबरोबर पंजाब काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर नवजोत सिंग सिद्धू पटियालामध्ये पोहोचले आहेत. पटियालामध्ये त्यांचे घर देखील आहे. पटियाला येथे पोहोचल्यानंतर सिद्धू यांनी पहिल्यांदा येथील दुकनिवारन साहिब गुरुद्वारा येथे नतमस्तक टेकवले आहे.

वाद संपण्याऐवजी वाद वाढू शकतो
यावरुन आता हे स्पष्ट झाले आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्रीपद सांभाळतील. तर नवजोत सिंग सिद्धू पंजाब राज्यात कॉंग्रेसचे नेतृत्व करतील. परंतु असे करूनही हा वाद संपेल असे वाटत नाही. उलट हा वाद अजून वाढायची शक्यता आहे. खरंतर सर्व आमदारांनी रविवारीच सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये सोनिया गांधींना विनंती केली होती की, नवजोत सिंग सिद्धू यांच्याकडे सभापतीपद सोपवले जाऊ नये.

मात्र नवजोत सिंग सिद्धू यांना पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. आतापर्यंत, जेव्हा केव्हा कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री किंवा अध्यक्ष बनले जातात, तेव्हा राज्य कार्यकारिणी सोनिया गांधी यांच्या नावे पत्रे लिहिले जात असत. परंतु हे असे पहिल्यांदाच झाले आहे की, सोनिया गांधी यांनी बैठक बोलावली होती. त्याचबरोबर दुसरीकडे अध्यक्षांची घोषणा देखील केली गेली आहे. पंजाब कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारिणीने सोमवारी बैठक बोलावली असून त्यात हाय कमांडचा निर्णय राज्य कॉंग्रेस मान्य करेल, असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या बैठकीपूर्वीच दिल्लीहून निर्णय घेण्यात आला होता.

कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या पत्रात, कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी आतापर्यंत केलेल्या कामांबद्दल आभार मानले आहेत. सध्या सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुराचे एआयसीसी प्रभारी असलेले कुलजित सिंग नागरा यांना या पदापासून मुक्त केले जाईल, असे सांगण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

संजू सॅमसनच्या पदार्पणाची चर्चा असूनही इशान किशनला का मिळाली संधी? कारण आले पुढे

किंग खानचं मोठ्ठं काळीज! कठीण काळातून जाणाऱ्या दिनेश कार्तिकला केली होती ‘अशी’ मदत

श्रीलंकेविरुद्ध पृथ्वी शॉमध्ये दिसली ‘विरु’ची झलक; ताबडतोड फलंदाजीसह सेहवागच्या विक्रमाची केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---