जगभरातील सार्वकालिन सर्वोत्तम क्रिकेटपटूंची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा त्यात राहुल द्रविड याच्या नावाचाही समावेश होतो. द्रविडने त्याच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम नावावर केले आहेत. एक क्रिकेटपटूसोबतच द्रविडने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी20 विश्वचषक 2024पर्यंत वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे. सध्या द्रविड कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अशातच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत तो पत्नी विजेता हिच्यासोबत दिसत आहे.
राहुल द्रविड आणि पत्नी विजेताचा फोटो व्हायरल
राहुल द्रविड आणि त्याची पत्नी विजेता (Rahul Dravid and wife Vijeta) यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो 19 वर्षांखालील कूच बिहार ट्रॉफी (U19 Cooch Behar Trophy) स्पर्धेतील असल्याचे सांगितले जात आहे. हे जोडपे आपला मुलगा समित द्रविड (Samit Dravid) याला खेळताना पाहण्यासाठी गेले होते. व्हायरल होत असलेल्या एका फोटोत भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक द्रविडला श्रीकांतदत्त नरसिम्हा राजा वाडेयार मैदानावरील आपल्या पत्नी विजेतासोबत पायऱ्यांवर बसल्याचे आणि आपल्या मुलाला खेळताना पाहताना स्पॉट केले.
India head coach Rahul Dravid and his wife Vijeta watch the proceedings of the Cooch Behar U-16 Trophy match between Karnataka and Uttarakhand at the SDNRW Ground in Mysuru on Friday. Samit Dravid is a part of the squad pic.twitter.com/I7Ww0Eh7TP
— Manuja (@manujaveerappa) December 1, 2023
कर्नाटकची टक्कर उत्तराखंडशी
या सामन्यात कर्नाटकची टक्कर उत्तराखंडशी होत आहे. उत्तराखंडने पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत 9 विकेट्स गमावत 232 धावा केल्या. कर्णधार आरव महाजनने 127 धावा केल्या. राहुल द्रविडचा मुलगा समितने या सामन्यात 5 षटके गोलंदाजी केली. यात त्याने 2 निर्धाव षटके टाकली. मात्र, त्याला विकेट घेता आली नाही. समित मुख्यत: फलंदाज आहे. मागील सामन्यात त्याने हिमाचलप्रदेश विरुद्ध खेळताना अर्धशतक केले होते. त्यापूर्वी दिल्लीविरुद्ध खेळताना समितने अर्धशतक झळकावले होते. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात समितने 8 षटकात 8 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या होत्या.
भारतीय संघाचा प्रशिक्षक राहणार
राहुल द्रविड याने 2021 मध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक बनला होता. त्याचा कार्यकाळ 2023 विश्वचषकापर्यंतच होता. आता बीसीसीआयने त्याचा कार्यकाळ वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, याची वेळ अद्याप सांगितली नाहीये. वृत्तांनुसार, टी20 विश्वचषकापर्यंत द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. स्पर्धा जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळली जाणार आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या द्रविडने 2012मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. त्याच्या नावावर कसोटी आणि वनडेत 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. (former indian cricketer rahul dravid and his wife vijeta watching son samit play in u 19 cooch behar trophy)
हेही वाचा-
IND vs AUS: बॅाल लागूनही पंचांनीच मागितली माफी, भारतीय क्रिकेटर जीतेश शर्माने मारला होता शॅाट
उपकर्णधार असलेला रहाणे आता टीमच्या बाहेर कसा? दिग्गज क्रिकेटपटूचा बोर्डाला सवाल