भारताचा माजी क्रिकेटर सलील अंकोलाच्या (Salil Ankola) आईच्या निधनाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. सलीलची आई 77 वर्षांची होती. सध्या पुणे पोलिसांचे एक पथक सलीलच्या घरी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या मानेवर वार करण्यात आले होते, परंतु घरात जबरदस्तीने प्रवेश केला नव्हता. हा खून आहे की आणखी काही याचा तपास पोलीस करत आहेत.
सलील अंकोलाने (Salil Ankola) त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने एक फोटो शेअर करून आईच्या मृत्यूची माहिती दिली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘गुडबाय आई.’
पुणे पोलिस डीसीपी संदीप गिल यांनी सांगितले की, “आम्हाला त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. शवविच्छेदनानंतर चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण खात्री देऊ शकत नाही. प्रथमदर्शनी, त्यांच्या मानेवर स्वतःहून झालेली जखम आहे. स्वयंपाकघरातील चाकू वापरण्यात आला असून खोलीचा दरवाजा आतून बंद करण्यात आला आहे. मानेवर जखम आहे. नंतर मोलकरीण, पोलिसांना व इतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहेत.”
सलील अंकोलाच्या (Salil Ankola) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने केवळ 21 सामने खेळले आहेत. 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत त्याने पदार्पण केले होते. या सामन्यात महान सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) पहिल्यांदाच सहभागी झाला होता. सलीलने दोन्ही डावात प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र, पहिला कसोटी सामनाच त्याचा शेवटचा ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूला मिळेल टीम इंडियात संधी? गोलंदाजीतही देतो योगदान
IND vs BAN; टी20 मालिकेत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड
गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांच्या कोचिंगमधील 5 मोठे फरक, सविस्तर जाणून घ्या