आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामाची क्रिकेट चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. तत्पूर्वी आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ अनेकदा चर्चेचा विषय बनतो. आरसीबीला आतापर्यंत एकही आयपीएल जेतेपद जिंकता आले नाही, परंतु तरीही चाहत्यांना हा संघ खूप आवडतो. कोहलीमुळे या संघावर चाहते खूप प्रेम करताना दिसतात. आता भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीवर निशाणा साधत म्हटले आहे, एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) चुकीच्या फ्रँचायझीकडून खेळला.
स्टार स्पोर्ट्सवर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या संघांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मांजरेकर म्हणाले की, डिव्हिलियर्सला आयपीएलमध्ये एक चांगला खेळाडू म्हणून पाहिले जाऊ शकले असते, परंतु तो चुकीच्या फ्रँचायझीकडून खेळला.
संजय मांजरेकर म्हणाले, “एबी शानदार होता. एबीची महानता अशी होती की त्याची कसोटीत सरासरी 50 होती. अगदी वनडे सामन्यातही. म्हणूनच तो एक उत्तम खेळाडू आहे. पण जर तुम्ही फक्त टी20 क्रिकेट पहा, मी दोन्ही खूप पाहतो. आयपीएलमध्ये एबीचा योग्य वापर झाला नाही. त्याची खरी क्षमता. त्यामुळे, आयपीएलमध्ये आम्हाला त्याच्याकडून फारसे काही मिळाले नाही आणि हो, माफ करा, पण तो चुकीच्या फ्रँचायझीसाठी खेळला. जर तो दुसरीकडे कुठेतरी, खेळला असता तर आपण त्याची महानता पाहिली असती.”
एबी डिव्हिलियर्सने 2008 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 2011 मध्ये, डिव्हिलियर्स आरसीबी संघात सामील झाला आणि त्याने त्याची आयपीएल कारकीर्द संपेपर्यंत संघ बदलला नाही. तो 2021 पर्यंत आरसीबीकडून खेळला. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 184 सामने खेळले, 170 डावांमध्ये फलंदाजी करताना 39.47च्या सरासरीने आणि 151.68च्या स्ट्राईक रेटने 5,162 धावा केल्या. दरम्यान त्याने 40 अर्धशतकांसह 3 शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
स्म्रीती मानधनाने पटकावला ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ इयर’ पुरस्कार…!
IND vs ENG; मोहम्मद शमीची भारताला गरज नाही? काय म्हणाले बीसीसीआय सूत्र
3 भारतीय गोलंदाज, ज्यांनी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये एका सामन्यात दिल्या सर्वाधिक धावा