भारतीय संघाला येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत इंग्लंड संघाकडे भारतीय संघाने फेब्रुवारी-मार्चदरम्यान केलेल्या पराभवाची परतफेड करण्याची उत्तम संधी असणार आहे. याबाबत माजी भारतीय कर्णधाराने भाष्य केले आहे.
भारतीय संघाने वर्षाच्या सुरुवातीलाच कसोटी मालिकेत इंग्लंड संघावर २-१ ने जोरदार विजय मिळवला होते. या मालिकेत खेळपट्टीचा वाद चांगलाच रंगला होता. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी, ‘द टेलीग्राफ’ मध्ये लिहिलेल्या स्तंभात म्हटले की, “भारतातील खेळपट्टीवर टीका करणाऱ्या इंग्लंड संघाने वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी तयार केली तर, मला आश्चर्य होणार नाही. भारतीय संघ या आव्हानासाठी तयार असेल. कारण भारतीय संघाकडेही, उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. जे परिस्थिती अनुसार फलंदाजांच्या अडचणीत वाढ करू शकतात.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “भारतातील खेळपट्टीवर टीका केल्यानंतर यात काही शंका नाही की, इंग्लंडच्या खेळपट्टीवर गवताचा वापर केला जाईल. परंतु आता ही, भारतीय संघासाठी चिंतेची बाब नसून, इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ करणारी बाब आहे.”
भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत इतिहास रचणार आहे, असे सुनील गावसकरांना वाटते. भारतीय संघ ही मालिका किती सामन्यांच्या फरकाने जिंकेल याबाबत त्यांनी कुठलेही वक्तव्य केले नाहीये.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), रिद्धिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ साठी ‘या’ मोठ्या स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार बदल? बीसीसीआय करत आहेत चर्चा
बुमराह की बोल्ट? कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापूर्वी दिग्गजाने सांगितला सर्वोत्तम गोलंदाज
साऊथम्पटनच्या एकाच हॉटेलमध्ये पुरुष संघासह महिला संघ राहणार विलगीकरणात, ‘हे’ आहे कारण






