भारतीय संघाचा (team india) माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना (suresh raina) याला पितृशोक झाला आहे. त्याचे पडील त्रिलोक चंद रैना यांचे रविवारी (६ फेब्रुवारी) निधन झाले. मागच्या मोठ्या काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर या लढ्यात त्यांनी हार मानली. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचे वडील दारुगोळा निर्मितीच्या कारखान्यात काम करायचे. दरम्यान, रैनाने मागच्या दोन वर्षांपूर्वी आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि सध्या तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी इच्छुक होता.
सुरेश रैना भारतीय संघाच्या इतिहासातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याने देशाचे १८ कसोटी सामने, २२६ एकदिवसीय सामने आणि ७८ टी२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. रैनाचे मुळ गाव जम्मू काश्मीरमधील रैनावारी आहे. परंतु १९९० च्या दशकात त्याचे वडील त्रिलोकचंद कुटुंबासह गाजियाबादच्या मुरादनगरमध्ये स्थायिक झाले. त्याचे वडील भारतीय सैन्यासाठी दारुगोळा बनवण्याचे काम करायचे. रैनाने एक जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याचे वडील बॉम्ब बनवण्यामध्ये तज्ञ होते.
सुरेश रैनाने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा त्यांना घरखर्च आणि रैनाच्या प्रशिक्षणासाठी पैसे कमी पडायचे. त्यावेळी त्याच्या वडिलांना पगार कमी होता आणि याच कारणास्तव ही अडचण निर्माण होत होती. मात्र, नंतर त्याच्या वडिलांचे एक चिंता कमी झाली. रैनाला १९९८ मध्ये लखनऊच्या गुरु गोविंद सिंग स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. रैनाने एका मुलखातीत सांगितले होते की, त्याचे वडील त्या सैनिकांच्या कुटुंबाची देखरेख करतात, जे शहीद झाले आहेत. ते त्या कुटुंबांना आर्थिक मदत करायचे आणि काळजी घ्यायचे की त्यांना त्या सर्व सोईसुविधा मिळाव्या, जो त्यांचा अधिकार आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्तीच घोषणा केली होती. धोनीने इंस्टाग्राम पोस्टमधून ही माहिती दिल्यानंतर काहीच वेळात रैनानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना स्वतःच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती दिली होती. धोनी आणि रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी मागच्या अनेक हंगामांपासून खेळत आले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा १००० वा वनडे! वाचा जलद शतक ते सर्वोत्तम गोलंदाजी पर्यंतची वनडे इतिहासातील खास आकडेवारी