अनेक भारतीय खेळाडू हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करुन भारतीय संघाची दारं ठोठावतात. यातील मोजक्याच खेळाडूंना भारतीय संघाकडून प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये टी२०, वनडे व कसोटी सामने होतात. त्यातून अनेक खेळाडू मर्यादीत षटकं किंवा कसोटी किंवा दोन्हीमध्ये आपली दावेदारी सांगतात. परंतू चांगली कामगिरी करुनही संधी मिळेलच असे नाही. आता अशीच काहीशी दावेदारी भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचा भाचा मयांक डागरने आपल्या कामगिरीच्या जोरावर केली आहे.
२४ वर्षीय मयांक डागर हिमाचल प्रदेशकडून देशांर्गत क्रिकेट खेळतो. दिल्लीत जन्म झालेल्या मयांकने शिमल्यातून आपले शालेय शिक्षण पुर्ण केले आहे. मयांक आपल्या फिटनेसबद्दलही प्रचंड जागरुक आहे. याचे फोटो तो सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. आपल्या जबरदस्त लुक्समुळे त्याची तुलना थेट विराट कोहलीशी होते.
कामगिरीतही नाही कमी
हिमाचल प्रदेशकडून फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या मयांकने विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामात ठिकठाक कामगिरी केली आहे. ५ सामन्यात त्याने ५३.७५च्या सरासरीने ५ विकेट्स घेतल्या तर ३३ च्या सरासरीने ६६ धावा केल्या. हे आकडे जरी चांगले नसले तरी त्याचे देशांर्गंत क्रिकेटमधील एकूण आकडे मात्र चांगले आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने २३ सामन्यात २१.३५च्या सरासरीने ५९८ धावा केल्या आहेत, तसेच ३०.३१च्या सरासरीने ६४ विकेट्स देखील घेतल्या आहेत. तसेच त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ३१ सामन्यात ३४ व टी२० क्रिकेटमध्ये ३१ सामन्यात २९ विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २४६ व टी२० क्रिकेटमध्ये ४६ धावा त्याने केल्या आहेत. २०१८मध्ये किंग्ज ११ पंजाब संघाने मयांकसाठी २० लाख रुपये मोजले होते परंतू त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड टी२० मालिका रद्द करा, नाहीतर स्वत:ला जिवंत जाळेन; एका व्यक्तीची थेट पोलिसांना धमकी
अरे बापरे! इशान किशनच्या पदार्पणाच्या दिवशी गर्लफ्रेंडने केलं असं काही, पाहून वाटेल आश्चर्य
इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार भारतीय संघात जागा?






टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा