---Advertisement---

‘विश्वचषकातील स्थान पक्क,’ सूर्यकुमारच्या आक्रमक खेळीची भारतीय दिग्गजाला भुरळ; उधळली स्तुतिसुमने

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 1:44 PM
---Advertisement---

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडचा आठ धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. सामनावीर सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत 57 धावा केल्या. त्यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त़्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिलाच चेंडूवर षटकार मारला. प्रत्येकजण त्याच्या खेळीबद्दल कौतुक करत असताना भारताचा माजी अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने देखील त्याची प्रशंसा केली आहे.

सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकानंतर युवराज सिंगने ट्विट करताना असे म्हटले आहे की, ‘सूर्यकुमार यादवच्या खेळीसाठी मी खूप आनंदी आहे. तो आयपीएल सामना खेळत असल्यासारखे फलंदाजी करत आहे. माझ्या विश्वचषक संघात त्याचे स्थान निश्चित आहे.’

इरफान पठाण, हरभजन सिंग, वसीफ जाफर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासारख्या दिग्गजांनी देखील सूर्यकुमारच्या खेळीबद्दल त्याचे स्वागत केले. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्वीट करताना, ‘निडर, नाविन्यपूर्ण, आक्रमक अशी सूर्यकुमारची फलंदाजी पाहून खूप आनंद झाला. ही गंभीर गुणवत्तेची खेळी असून ही तर अर्धशतकाची सुरुवात आहे,’ असे म्हटले.

सूर्यकुमार यादवने आदिल रशीदला चौकार मारत केवळ 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. परंतु या सामन्यात त्याला वादग्रस्त पद्धतीने आऊट देण्यात आले. सुर्यकुमारने सॅम करनला मारलेल्या चेंडूवर डेव्हिड मलानने झेल पकडला. मात्र रीप्लेवरून हे स्पष्ट दिसत होते की, चेंडूने मैदानाला स्पर्श केला आहे. परंतु वेगवेगळ्या बाजूने रिप्ले पाहिल्यानंतर थर्ड अंपायरने मैदानातील पंचांच्या आऊटच्या निर्णयावरती कायम राहण्यास सांगितले.

सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या कामगिरीबद्दल वक्तव्य केले की, “ज्या पद्धतीने आजचा सामना झाला याचा मला आनंद झाला. मी जसा आहे त्याप्रमाणे मैदानावर राहण्याचा प्रयत्न केला. मैदानावरती मी स्वतःशी बोलत होतो. गोष्टी सोपी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. टीम मॅनेजमेंट आणि विराट भाई यांनी मला मैदानाच्या आत जा आणि मोकळेपणाने खेळण्यास सांगितले. ते म्हणाले की, जणू तु आयपीएलमध्ये खेळत आहे असे समजून खेळ. फक्त जर्सी बदलली आहे, परंतु तुमची खेळण्याची शैली तीच असावी असे सांगितले. यामुळे मला खूप मदत झाली. त्याचप्रमाने मी खेळण्याचा प्रयत्न केला आणि सर्व काही चांगले झाले.”

महत्त्वाच्या बातम्या-

“कोणी बुमराहच्या क्षमतेवर प्रश्न…,” पाकिस्तानी खेळाडूने भारतीय गोलंदाजाला खेचले अंतर्गत वादात

इशान किशनला का मिळाली नाही चौथ्या टी२०त संधी? कॅप्टन कोहलीने सांगितले कारण

कर्नाटकच्या युवा गोलंदाजाचं चमकलं नशीब, इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्णासाठी सज्ज; ‘अशी’ राहिली कमागिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---