---Advertisement---

“कोणी बुमराहच्या क्षमतेवर प्रश्न…,” पाकिस्तानी खेळाडूने भारतीय गोलंदाजाला खेचले अंतर्गत वादात

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 1:26 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर, याने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या गोलंदाजाने आपल्या निवृत्तीसाठी पाकिस्तान संघातील प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांना कारणीभूत ठरवले होते. यानंतर आता त्याने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे उदाहरण देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे.

मोहम्मद आमिरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका करत म्हटले आहे की, “क्रिकेट बोर्डाची सकारात्मक वृत्ती संघातील खेळाडूंना चांगले प्रदर्शन करण्यास प्रेरणा देत असते. मला वाटते की, एखाद्या खेळाडूची केवळ चार किंवा पाच सामन्यातील कामगिरी पाहणे योग्य मानसिकता नाही. जर तुम्हाला लक्षात असेल तर, बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत फक्त १६ गडी बाद केले होते. परंतु कोणीही त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला नाही. कारण सर्वांना माहीत आहे, तो एक सामना जिंकवणारा गोलंदाज आहे. त्यावेळेस भारतीय संघ व्यवस्थापकांनी त्याला समर्थन दिले होते.”

संघ व्यवस्थापकांनी खेळाडूला मदत करायला हवी

तसेच तो पुढे म्हणाला की, “जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नसतो. तेव्हा संघ व्यवस्थापनाने त्याला मदत केली पाहिजे. अशा परिस्थितीत खेळाडूला कधीही एकटे सोडू नये. सर्व खेळाडू अविश्वसनीय आहेत, असे गृहित धरून व्यवस्थापन फक्त बसून विश्रांती घेऊ शकत नाही.”

क्रिस्टियानो रोनाल्डोसारख्या खेळाडूंनी बनलेला एक संपूर्ण संघ घ्या

संघ व्यवस्थापकांवर निशाणा साधत आमिर म्हणाला, “जेव्हा खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल, तेव्हा त्याला मदत करणे व्यवस्थपकांचे काम असते. जर अशी स्थिती असेल तर क्रिस्टियानो रोनाल्डोसारख्या खेळाडूंनी बनलेला एक संपूर्ण संघ घ्या. जेणेकरुन तुम्ही मागे बसून विश्रांती घेऊ शकाल आणि काहीही करायची आवश्यकता भासणार नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

कर्नाटकच्या युवा गोलंदाजाचं चमकलं नशीब, इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्णासाठी सज्ज; ‘अशी’ राहिली कमागिरी

इशान किशनला का मिळाली नाही चौथ्या टी२०त संधी? कॅप्टन कोहलीने सांगितले कारण

तपश्चर्या आली फळाला! टी२० नंतर सूर्यकुमारची वनडेत दिमाखात एन्ट्री, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---