भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात झालेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने 3-0 ने भारतावर वर्चस्व गाजवले. पण आता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळायची आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणार आहे. त्याआधीच भारताचे माजी विश्वचषक विजेते क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल. संघ इतका चांगला आहे की या धक्क्यांना घाबरणार नाही, असा विश्वास संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी व्यक्त केला. पाटील यांनी त्यांच्या ‘बियॉन्ड बाऊंडरीज’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “त्यांना ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्यांच्याच भूमीवर खेळायचे आहे. मागच्या वेळी तिथे काय झाले ते त्यांना विसरावे लागेल. न्यूझीलंडविरूद्धच्या या मालिकेत जे घडले तेही त्यांना विसरून पुढे जावे लागेल.”
ते म्हणाले, “विश्वचषक जिंकण्यापूर्वी आम्ही सर्व सराव सामने गमावले होते. त्यामुळे त्यांचे स्मरण केले पाहिजे. तुम्हाला सकारात्मक विचार करावा लागेल आणि सकारात्मक पद्धतीने खेळावे लागेल, तरच तुम्हाला सकारात्मक निकाल मिळेल. बचावात्मक क्रिकेट खेळून जिंकण्याचा विचार केला तर तसे होणार नाही. मात्र न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत व्हाईटवॉश हा भारतीय क्रिकेटसाठी धोक्याचा इशारा आहे.”
पुढे बोलताना पाटील म्हणाले, “न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेतील पराभव धोक्याचा इशारा होता. आमचा संघ खराब खेळत आहे असे नाही. काही महिन्यांपूर्वी त्याने टी20 विश्वचषक जिंकला होता. आमच्या संघात काही मोठे खेळाडू आहेत, ते नक्कीच पुनरागमन करतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
ICC Champions Trophy; ‘या’ दिवशी होणार वेळापत्रकाची घोषणा
IPL Mega Auction; मेगा लिलावात अनसोल्ड ठरू शकतो इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज?
“भारतीय कोचिंग स्टाफमध्ये अभिषेक नायरची भूमिका काय?” माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य