सध्या देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. सामान्य नागरिकांसह नेतेमंडळी, बॉलीवूड स्टार्स आणि खेळाडूंना देखील कोरोनाची लागण होऊ लागली आहे. दरम्यान, भारतीय संघाला २०११ मध्ये विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे १५ (IPL 2022) वे हंगाम सुरू होणार आहे. या हंगामासाठी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow super giants) संघात मेंटोर म्हणून निवड करण्यात आलेल्या गौतम गंभीर याला (Gautam Gambhir) कोरोनाची लागण झाली आहे. एक दिवसांपूर्वी लखनऊ संघाने आपल्या संघाचे नामकरण केले आहे.
गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे.(Gautam Gambhir COVID positive)
गौतम गंभीर हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ” कोरोनाची सूक्ष्म लक्षणे आढळून आली असता मी, कोरोनाची चाचणी केली आणि ती पॉसिटीव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की, त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी.” या संघाने ३ खेळाडूंना रिटेन केले आहे. ज्यामध्ये केएल राहुल, मार्कस स्टोइनिस आणि रवी बिष्णोई यांचा समावेश आहे. आगामी हंगामात केएल राहुल या संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
After experiencing mild symptoms, I tested positive for COVID today. Requesting everyone who came into my contact to get themselves tested. #StaySafe
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) January 25, 2022
आयपीएल २०२२ स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर, सर्व १० संघांनी आतापर्यंत ३३ खेळाडूंना रिटेन केले आहे. आगामी हंगामात नव्याने समाविष्ट होणार संघ अहमदाबाद संघाने हार्दिक पंड्याला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. या स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळले जाणार आहेत. ज्याची सुरुवात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. तसेच १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेसाठीचे मेगा ऑक्शन पार पडणार आहे. ही स्पर्धा भारतात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
राहुल खरोखरच तुम्हाला कर्णधार वाटतो का? बीसीसीआय अधिकाऱ्याचा पत्रकाराला प्रतिप्रश्न
अख्तर म्हणतोय,”टी२० विश्वचषकात पाकिस्तान पुन्हा भारताला हरवेल”
हे नक्की पाहा :