---Advertisement---

‘हे’ २ धाकड अष्टपैलू एकत्र खेळले तर भारत नक्कीच कसोटी चॅम्पियनशीप जिंकेल; माजी खेळाडूचे भाष्य

On: बुधवार, मे 12, 2021 10:00 AM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अवघ्या एका महिन्यावर आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ने २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने असणार आहेत. या मोठ्या सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तसेच अनेक दिग्गज खेळाडू या मोठ्या सामन्यापूर्वी आपले मत मांडताना दिसून येत आहेत. अशातच माजी भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझानेही आपले मत मांडले आहे.

भारतीय संघासाठी २४ कसोटी सामने खेळणाऱ्या प्रज्ञान ओझाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी आपले मत मांडले आहे. त्याच्या मते, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना सोबत खेळवायला हवं.

त्याने स्पोर्ट्स टुडेसोबत बोलताना म्हटले की, “दोघेही खेळू शकतात. त्यांनी दोघांनी खेळावं. ते दोघे फलंदाजी करू शकतात. दोघांना कुठल्याही प्रकारच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. सर्वात मोठी सकारात्मक बाब, जडेजाची फलंदाजी असू शकते. त्याची मायदेशातील कामगिरी उत्तम आहे. त्याने मायदेशात तिहेरी शतक झळकावले आहे. तो मोठी खेळी करू शकतो. तर अश्विनच्या नावे देखील कसोटी क्रिकेटमध्ये शतक आहेत. जर संधी मिळाली तर या सामन्यात या दोघांनीही खेळवायला हवं.”

तसेच ओझाने पुढे म्हटले की, “मी हनुमा विहारीला फॉलो करत होतो. इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी खेळणे विचारशील आहे आणि यामुळे आपल्याला ती परिस्थिती जाणून घेण्याची सवय होऊन जाते.”

भारतीय संघ पुढील ४ महिने इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. इथे त्यांना १८ जून ने २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तर त्यानंतर ४ ऑगस्टपासून भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला

भारताचा इंग्लंड दौरा
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन

कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँचेस्टर

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी चर्चेत असलेले पारस महांब्रे आहेत तरी कोण? वाचा

WTC Final: ‘या’ गोलंदाजावर दुर्लक्ष करणं टीम इंडियाची मोठी चूक; इंग्लंडमध्ये ८ वर्षे क्रिकेट खेळलेल्या फिरकीपटूचे भाष्य

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये रोहितला खेळवणं म्हणजे मोठी जोखीम, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---