भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एक मोठा धक्का बसला. एका वृत्तमाध्यमाने चेतन शर्मा यांच्याविरोधात स्टिंग ऑपरेशन केले आणि ते यशस्वी देखील झाले. शर्मा त्यावेळी भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. स्टिंग ऑपरेशचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी स्वतःहून निवड सिमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता या प्रकरणाताला काही महिने उलटून केल्यानंतर शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, ते आपल्या एका ट्वीटमुळे.
बीसीसीआयसोबतचे आपले संबंध तुडल्यानंतर चेतन शर्मा (Chetan Sharma) चांगलेच अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम शर्मांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील होत असल्याचे दिसते. आपल्या सोशल मीडिया खात्यावरून स्वतः शर्मांनी याविषयी खुलासा केला आहे. शर्माने ट्वीट केले आहे की, “आयुष्य आतापर्यंत खूप खडतर राहिले आहे. आता आपल्या जवळच्या आणि प्रिय लोकांपासूनही कुठल्या अपेक्षा राहिल्या नाहीत. आशा आहे माता राणीचा आशिर्वाद माझ्यासोबत असेल…”
https://twitter.com/chetans1987/status/1658919782182424576?s=20
दरम्यान, शर्मांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. काहीचन शर्मांविषयी काळजी व्यक्त करत आहेत, तर काहींनी हे आपल्या कर्माचे फळ असल्याचे बोलून दाखवले आहे. भारतीय संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी यावर्षी जानेवारी महिन्यात शर्माची फेरनिवड झाली होती. पण पुढच्याच महिन्यात त्यांना या स्टिंग ऑपरेशनमुळे निवड समितीचे अध्यक्षपद सोडावे लागले.
एका वृत्तमाध्यमाने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेनत शर्मा बऱ्याच गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसले होते. शर्मा विराट कोहली यांच्यासह संघातील काही इतर खेळाडू, सौरव गांगुली, संघाच्या होणाऱ्य बैठकी आणि एकंदरीत बीसीसीआयविषयी बोलत होते. हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्यांनी स्वतः आपल्या पदाचा राजीनामा दिला. शर्मांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयला निवड समितीसाठी नवीन अध्यक्ष हवा आहे. सध्या हा कारभार शिव सुंदर दास प्रभारी अध्यक्ष म्हणून पाहत आहेत. लवकरच निवड समितीच्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली जाऊ शकते. (Former Indian team selection committee chairman Cheten Sharma expressed his regret on social media)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तानमध्ये होणार कसोटी मालिका? पीसीबीच्या प्रस्तावावर बीसीसीआयने दिली प्रतिक्रिया
मुंबईचा विजयरथ रोखणाऱ्या मोहसीनचा फॅन बनला स्टॉयनिस, खास शब्दांत गायले गोडवे






